चिंचवड प्रतिनिधी: चिंचवड पोलिसांनी वेताळनगर परिसरात मोकळ्या जागेत सुरू असलेल्या पत्त्यांच्या जुगारावर कारवाई करत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरया हाउसिंग सोसायटी, बिल्डिंग क्रमांक ५ च्या पार्किंगमधील मोकळ्या जागेत पाच जण आर्थिक फायद्यासाठी तीन पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी एकूण १ लाख १४ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३२/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये सुरेश उत्तम आरसुळ (वय ६५), देवीदास रामदास ढाकले (वय ४६), मणीगंडण विरपेरमल थेवर (वय ३६), दौलत मकबूल चान (वय ३४) आणि बुध्दानंद मारुती बनसोडे (वय ५५) यांचा समावेश आहे.
सदर कारवाईदरम्यान आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आल्याची नोंद आहे.ही कारवाई चिंचवड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.