Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»वाकडमध्ये स्टार बाजारातून ४२ हजारांचा किराणा माल लंपास; सात जणांविरुद्ध गुन्हा
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

वाकडमध्ये स्टार बाजारातून ४२ हजारांचा किराणा माल लंपास; सात जणांविरुद्ध गुन्हा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 31, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे/वाकड प्रतिनिधी : वाकड परिसरातील स्टार बाजारच्या दोन शाखांमधून गोवर्धन तूप/घी पाऊच, बदाम-काजू पाऊच तसेच इतर किराणा वस्तू असा एकूण ४२ हजार १०० रुपये किमतीचा माल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तीन पुरुष व चार महिलांविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता दत्त मंदिर रोड, वाकड येथील वशवन बिल्डिंगमधील स्टार बाजार येथे चोरीची घटना घडली. तसेच १२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता कलाटे वस्ती येथील स्टार बाजारमध्येही अशाच प्रकारे चोरी करण्यात आली.

या दोन्ही घटनांमध्ये तीन ते चार अनोळखी महिला आणि तीन पुरुष ऑटो रिक्षाने स्टार बाजारमध्ये आले. त्यांनी दुकानातील गोवर्धन घी/तूप पाऊच, बदाम-काजू पाऊच तसेच अन्य वस्तू चोरून नेल्या. चोरीस गेलेल्या वस्तूंची एकूण किंमत ४२,१०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

संशयितांमध्ये अंदाजे २५ ते ५५ वर्षे वयोगटातील चार महिलांचा समावेश असून, त्यापैकी एका महिलेने निळसर रंगाची ओढणी व विटकरी रंगाची कुर्ती, दुसरीने निळसर जिन्स व पांढरा स्वेटशर्ट, तिसरीने गुलाबी पंजाबी ड्रेस व पांढरी ओढणी, तर चौथ्या महिलेने आकाशी रंगाचा पंजाबी ड्रेस व लाल रंगाची ओढणी परिधान केली होती. तसेच अंदाजे २५ वर्षे वयोगटातील पुरुष निळसर रंगाची पॅन्ट व पांढऱ्या रंगाचा चटापट्या डिझाइनचा शर्ट परिधान केलेला असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले आहे.

याप्रकरणी सचिन पंडित बाघमारे (वय ३९, रा. सर्वे नं. १३, घिटे नगर, भोसरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाकड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि दराडे करीत असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनिगडीत पीएमपीएमएल बसच्या धडकेत ५८ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा
Next Article चिंचवडमध्ये मोकळ्या जागेत पत्त्यांचा जुगार; पाच जणांवर गुन्हा दाखल
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दहीहंडी उत्सवात ध्वनीप्रदूषणाचा दणका; १६ डॉल्बी सिस्टीमवर पोलिसांची कारवाई

September 7, 2026

विनापरवाना DJ वाजवणाऱ्या तीन दहीहंडी मंडळांना बावधन पोलिसांचा दणका

September 7, 2026

खून, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे अन् गांजा तस्करी; एकाच दिवशी गुन्ह्यांची मालिका

September 4, 2026

एम.डी. आणि अफिम तस्करी करणारे दोघे जेरबंद

September 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?