पुणे प्रतिनिधी: बाणेर आगारातील कायम वाहक क्र. ६५४५, श्री. धोंडू तात्या सुभाष गिरी यांनी कर्तव्य बजावताना सापडलेला सुमारे २५ हजार रुपये किमतीचा VIVO कंपनीचा मोबाईल फोन प्रामाणिकपणे आगार प्रशासनाकडे जमा करून प्रवाशाला परत केला. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी मार्ग क्र. ३४/३ वर कर्तव्य बजावत असताना श्री. गिरी यांना प्रवाशांचा मोबाईल फोन सापडला. सदर मोबाईल श्री. कैलास सदाशिव भोसले यांचा असल्याचे निष्पन्न झाले.
मोबाईल स्वतःकडे न ठेवता श्री. गिरी यांनी तत्काळ तो बाणेर आगारात जमा केला. त्यानंतर संबंधित प्रवाशाशी संपर्क साधून आवश्यक ती खातरजमा करण्यात आली. खातरजमा पूर्ण झाल्यानंतर मोबाईल फोन सुरक्षितपणे श्री. कैलास सदाशिव भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
प्रवाशाची मौल्यवान वस्तू प्रामाणिकपणे परत करून श्री. धोंडू तात्या सुभाष गिरी यांनी सचोटी, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कृतीमुळे परिवहन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांप्रती प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होण्यास निश्चितच मदत होणार आहे.
बाणेर आगार प्रशासनाच्या वतीने असि. डेपो मॅनेजर श्री. श्रीहरी ढाकणे यांनी श्री. गिरी यांचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक केले.
“प्रामाणिक सेवा – प्रवाशांचा विश्वास!” हा संदेश त्यांच्या या कृतीतून अधोरेखित झाला आहे.