Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्या वतीने जानेवारी २०२७ मध्ये कोल्हापूर येथे भव्य महामेळाव्याचे आयोजन
पुणे

‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्या वतीने जानेवारी २०२७ मध्ये कोल्हापूर येथे भव्य महामेळाव्याचे आयोजन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 28, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

वडार समाजाच्या हक्कांसाठी आता निर्णायक लढा; जानेवारीत कोल्हापुरात महामेळावा;पिंपरी चिंचवड येथे ३० ऑगस्ट रोजी संकल्प मेळावा

संस्थापक अध्यक्ष तथा नवी मुंबई महानगरपालिका विरोधी पक्षनेते विजय चौगुले प्रमुख मार्गदर्शक

पूर्वतयारी आयोजक, पुणे जिल्ह्याची जबाबदारी असलेले संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश धोत्रे यांच्यांकडे

पिंपरी, दि. २८ ऑगस्ट: वडार समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघटितपणे निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्या वतीने जानेवारी २०२७ मध्ये कोल्हापूर येथे भव्य महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय अथवा राज्य सरकारमधील मंत्री महोदयांच्या उपस्थितीत होणाऱ्या या महामेळाव्यात वडार समाजाच्या विविध मागण्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडून त्या मंजूर करून घेण्यासाठी व्यापक जनआंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड येथे ३० ऑगस्ट रोजी वडार समाज संकल्प मेळावा 

या महामेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी पुणे जिल्ह्याची जबाबदारी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी स्वीकारली असून, त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड येथे ३० ऑगस्ट रोजी वडार समाज संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. क्वालिटी सर्कल फोरम, टेल्को रोड, भोसरी येथे सकाळी ११ वाजता हा मेळावा होणार आहे.

या संकल्प मेळाव्यास ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. समाजाच्या हक्कांसाठी केवळ मागण्या न करता त्या संघटित शक्तीच्या माध्यमातून शासनाकडून मंजूर करून घेण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात येणार आहे.

समाजाच्या हक्कांसाठी एकजुटीचा संकल्प …..

वडार समाजाच्या जातीच्या दाखल्यासाठी असलेली १९६१ च्या पुराव्याची अट शिथिल करावी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसह शासनाच्या विविध योजनांतून समाजातील कुटुंबांना पक्की घरे मिळावीत, बार्टी व आर्टीच्या धर्तीवर ‘शूरवीर हरबा वडार रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ स्थापन करावे, बेरोजगारांना स्वयंरोजगार व लघुउद्योगासाठी वसंतराव नाईक भटक्या-विमुक्त विकास महामंडळाकडून विनाअट कर्ज उपलब्ध करून द्यावे, भूमिहीन कुटुंबांना उपजीविकेसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, महिला बचत गटांना स्वस्त धान्य दुकाने देण्यात यावीत, रॉयल्टीची मर्यादा वाढवून सवलत द्यावी, तसेच दगडखाण कामगार व समाजातील बांधकाम क्षेत्राशी संबंधित घटकांना शासकीय व निमशासकीय बांधकाम कामांमध्ये पीडब्ल्यूडीमार्फत आरक्षण द्यावे, अशा प्रमुख मागण्या महामेळाव्यात मांडण्यात येणार आहेत.

वडार समाज हा आपल्या कष्ट, श्रम आणि शिल्पकलेच्या बळावर महाराष्ट्राच्या विकासात योगदान देणारा समाज आहे. मात्र, आजही समाजातील अनेक कुटुंबे मूलभूत सुविधा, शिक्षण, रोजगार, निवारा आणि आर्थिक स्थैर्यापासून वंचित आहेत. त्यामुळे ‘हक्कासाठी एकजूट आणि भविष्यासाठी संघर्ष’ या भावनेतून जानेवारीतील कोल्हापूर महामेळावा हा समाजाच्या पुढील वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

वडार समाज गौरव पुरस्कार ….

या संकल्प मेळाव्यात समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘वडार समाज गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यंदाचा पुरस्कार पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर हनुमंतराव भोसले, अवर सचिव मंत्रालय (मुंबई) मनोहर बंदपट्टे आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मोरे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

मेळाव्यास महापौर रवी लांडगे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच नगरसेवक राहुल भोसले, अवर सचिव मंत्रालय मुंबई राजेश अलकुटे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे स्वीय सहाय्यक यल्लाप्पा गाडीवडर, ‘मी वडार’ संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष मोहिते, संपर्कप्रमुख सुधीर पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे, सहाय्यक संचालक मंत्रालय राजू धोत्रे, वडार एकता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत विटकर, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अमोल धोत्रे, साई संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सतीश भोसले, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष शंकर चौगुले, महिला प्रदेशाध्यक्ष सुनीता जाधव, सहायक पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय धोत्रे, वडार मजूर शिल्प प्रतिष्ठानचे श्यामराव विटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुणे ग्रामीण प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज कलगुटकी, सामाजिक कार्यकर्ते संदिपान झोंबाडे आणि उद्योजक वसंत विटकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील संकल्प मेळाव्यातून जानेवारीतील कोल्हापूर महामेळाव्याची मुहूर्तमेढ रोवली जाणार असून, वडार समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्रभरातील समाजबांधवांनी एकत्र येण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले आणि प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी केले आहे.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदिव्यांगांसाठी सुविधा, रोजगार आणि प्रशिक्षणाला चालना; पिंपरी-चिंचवड शहर अधिक समावेशक करण्याचा निर्णय
Next Article मोरवाडी मनपा आयटीआयच्या प्रशिक्षणार्थीची सौदी अरेबियात ‘ज्युनियर डिझायनर’ म्हणून निवड
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ चे दिमाखात उद्घाटन

September 7, 2026

दहीहंडीतील लावणीवरून राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा!

September 7, 2026

धनगर ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?