Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»दिव्यांगांसाठी सुविधा, रोजगार आणि प्रशिक्षणाला चालना; पिंपरी-चिंचवड शहर अधिक समावेशक करण्याचा निर्णय
पिंपरी चिंचवड

दिव्यांगांसाठी सुविधा, रोजगार आणि प्रशिक्षणाला चालना; पिंपरी-चिंचवड शहर अधिक समावेशक करण्याचा निर्णय

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 28, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय

पिंपरी-चिंचवड, दि. २८ऑगस्ट २०२६ :- दिव्यांग नागरिकांना समान संधी, आवश्यक सुविधा आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देत त्यांचे जीवन अधिक सुलभ व सक्षम करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या दृष्टीने दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या संचालक मंडळाची बैठक आयुक्त तथा फाऊंडेशनचे अध्यक्ष डाॅ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. बैठकीत दिव्यांगांच्या शिक्षण, रोजगार, कौशल्यविकास, पुनर्वसन, आरोग्य आणि सर्वांगीण सक्षमीकरणासंदर्भात विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, कंपनी सचिव गिरीश परळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे सल्लागार विजय कान्हेकर, वास्तुविशारद व सल्लागार अभिजित मुरुगकर यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

     शहरातील उद्यानांमध्ये संवेदनानुभव उद्यान

दिव्यांग मुलांना आणि व्यक्तींना निसर्गाच्या सान्निध्यात आनंददायी व संवेदनात्मक अनुभव घेता यावा, यासाठी शहरातील विविध उद्यानांमध्ये ‘संवेदनानुभव उद्यान’ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उद्यानांमध्ये स्पर्श, ध्वनी, सुगंध आणि दृश्य अनुभवांच्या माध्यमातून दिव्यांग मुलांच्या संवेदनात्मक विकासाला चालना देण्यासोबतच त्यांना मनोरंजन आणि आनंदाचे हक्काचे स्थान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

     दिव्यांगांच्या रोजगारासाठी उद्योग क्षेत्राशी समन्वय

दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्य आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड परिसरातील तसेच आजूबाजूच्या विविध औद्योगिक वसाहतींमधील उद्योग आणि आस्थापनांशी समन्वय साधण्यात येत आहे.

आतापर्यंत १२०० पेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींची नोंदणी झाली असून, त्यापैकी सुमारे ६५० व्यक्तींची माहिती तपासणी व कौशल्यनिहाय जुळवणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यापैकी ३५ दिव्यांग व्यक्तींना विविध आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, त्या समाधानकारकपणे कार्यरत आहेत, अशी माहिती फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांनी बैठकीत दिली.

दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय उद्योग महासंघाचे संचालक प्रसाद बच्छाव यांच्याशी आयुक्त डाॅ.विजय सूर्यवंशी यांनी यावेळी संवाद साधला. त्यांच्या माध्यमातून विविध कंपन्यांशी संवाद साधून दिव्यांग व्यक्तींच्या रोजगारासाठी विशेष चर्चासत्र आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले.

सार्वजनिक सुविधा अडथळामुक्त करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव

दिव्यांग नागरिकांना शहरातील सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितपणे आणि सहजतेने वावरता यावा, यासाठी सार्वजनिक इमारती तसेच विविध नागरी सुविधांची सर्वंकष सुलभता तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीनंतर आवश्यक त्या सुधारणा करून सार्वजनिक सुविधा अडथळामुक्त करण्यासाठी केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीच्या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यामुळे शहरातील सार्वजनिक इमारती, रस्ते, सुविधा आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सेवांमध्ये दिव्यांग व्यक्तींना सहज प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे.

     दिव्यांग व्यक्तींच्या काळजीवाहूंसाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम

दिव्यांग व्यक्तींची दैनंदिन काळजी घेणाऱ्या काळजीवाहू व्यक्तींना आवश्यक कौशल्य आणि शास्त्रीय प्रशिक्षण मिळावे, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने काळजीवाहू प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस बैठकीत व्यक्त करण्यात आला.

या प्रशिक्षणामुळे प्रशिक्षित काळजीवाहू व्यक्ती उपलब्ध होण्यास मदत होणार असून, दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना अधिक गुणवत्तापूर्ण सेवा व आधार मिळण्यास हातभार लागणार आहे. शिक्षण, कौशल्यविकास आणि पुनर्वसनाला प्राधान्य दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. दिव्यांग व्यक्तींचे शिक्षण, रोजगार, कौशल्यविकास, पुनर्वसन, आरोग्य, सामाजिक सहभाग आणि आर्थिक स्वावलंबन यासाठी सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.

दिव्यांग व्यक्तींना केवळ सुविधा उपलब्ध करून न देता त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समान संधी मिळाव्यात, त्यांच्या क्षमता आणि कौशल्यांना योग्य व्यासपीठ मिळावे तसेच ते स्वावलंबी व्हावेत, यासाठी फाऊंडेशनच्या उपक्रमांना आगामी काळात अधिक व्यापक स्वरूप देण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांचा लाभ शहरातील अधिकाधिक दिव्यांग नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. पिंपरी-चिंचवड शहर अधिक समावेशक, सुलभ, सुरक्षित आणि दिव्यांग-अनुकूल बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे निर्देश आयुक्त तथा दिव्यांग भवन फाऊंडेशनचे अध्यक्ष डाॅ.सूर्यवंशी यांनी दिले.दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने पुढील काळात अधिक व्यापक उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआपुलकीच्या धाग्याने जोडले सेवा आणि सुरक्षेचे बंध
Next Article ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेच्या वतीने जानेवारी २०२७ मध्ये कोल्हापूर येथे भव्य महामेळाव्याचे आयोजन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?