Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»आपुलकीच्या धाग्याने जोडले सेवा आणि सुरक्षेचे बंध
पिंपरी चिंचवड

आपुलकीच्या धाग्याने जोडले सेवा आणि सुरक्षेचे बंध

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

रक्षाबंधनानिमित्त शालेय विद्यार्थिनींनी अधिकारी, पोलीस व सुरक्षा रक्षकांना बांधली राखी

पिंपरी, दि. २८ ऑगस्ट २०२६ : रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा उत्सव नव्हे, तर एकमेकांच्या सुख दुःखात सोबत राहण्याची आणि रक्षणाची भावना जपणारा सण. याच भावनेला सामाजिक कृतज्ञतेची जोड देत चिखली येथील इनाव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थिनींनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असलेले महापालिका अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विद्यार्थिनींनी राखी बांधून आपुलकी, सन्मान आणि कृतज्ञतेचा संदेश दिला.

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी नगरसदस्य विकास साने, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि विशेष अधिकारी किरण गायकवाड यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी त्यांना राखी बांधून औक्षण केले. यावेळी महापालिका परिसराची सुरक्षा सांभाळणाऱ्या सुरक्षा रक्षकांनाही विद्यार्थ्यांनी राखी बांधली. तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील त्यांनी राखी बांधून त्यांच्या सेवेला कृतज्ञतापूर्वक सलाम केला.

राखी बांधल्यानंतर विद्यार्थिनींनी अधिकारी, कर्मचाऱ्यांशी साधला मनमोकळा संवाद

राखी बांधल्यानंतर विद्यार्थिनींनी अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. रक्षाबंधनाचा सण कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता शहरासाठी आणि समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणून या उपक्रमाकडे पाहत असल्याची भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केली.

यावेळी विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाच्या सणाचे महत्त्व आणि भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा व परस्पर रक्षणाची भावना अधोरेखित करणारे गीत सादर केले. विद्यार्थ्यांच्या निरागस स्वरांनी आणि उत्स्फूर्त सहभागाने महापालिका परिसरातील वातावरण अधिक प्रसन्न झाले. आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या व्यक्तींप्रती आदर व्यक्त करण्याची भावना विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणातून दिसून आली.

राखीच्या धाग्यातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

रक्षाबंधनाच्या निमित्ताने घेतलेला हा उपक्रम प्रेम आणि स्नेहापुरता मर्यादित न राहता सामाजिक भान आणि कृतज्ञतेची जाणीव जागवणारा ठरला. नागरिकांची सेवा करणारे महापालिका अधिकारी कर्मचारी, शहराच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे सुरक्षा रक्षक आणि कायदा सुव्यवस्था राखणारे पोलीस हे समाजाच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी विद्यार्थिनींनी राखीच्या माध्यमातून सुंदर आणि भावनिक संदेश दिला.

सेवाभावी घटकांप्रती आदराची भावना रुजविण्याचा प्रयत्न

लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, कृतज्ञता आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याप्रती सन्मानाची भावना निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. कुटुंबातील नात्यांना जोडणारा रक्षाबंधनाचा धागा समाजातील सेवाभावी घटकांशी जोडत विद्यार्थ्यांनी सणाला व्यापक सामाजिक अर्थ दिला.

शाळेच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनृत्य कलेतून कलाकारांना परमानंदाची अनुभूती – वरदा वैशंपायन
Next Article दिव्यांगांसाठी सुविधा, रोजगार आणि प्रशिक्षणाला चालना; पिंपरी-चिंचवड शहर अधिक समावेशक करण्याचा निर्णय
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?