रावेत प्रतिनिधी: रावेत परिसरात बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेला गांजा पोलिसांनी जप्त करून एका तरुणाला अटक केली. साहील राहुल चौरे (वय २१, रा. एस.बी. पाटील कॉलेजजवळ, सावित्री कॉर्नर, रावेत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास संदीप भोंडवे यांच्या मोकळ्या जागेलगत सावित्री कॉर्नर चौक ते भोंडवे पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
आरोपीकडून सुमारे ५४७ ग्रॅम वजनाचा आणि २७ हजार ३५० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. सदर गांजा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या जवळ बाळगल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार गोविंद हरीबा चव्हाण (ब.नं. १८७२) यांनी फिर्याद दिली आहे. रावेत पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा क्रमांक ३१५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खिळे करीत आहेत.