पिंपरी प्रतिनिधी : नेहरूनगर परिसरातील तैवकल्ला मशीदजवळ रस्त्याच्या कडेला पार्क केलेली बजाज पल्सर मोटारसायकल परवानगीशिवाय चोरी करून नेल्याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिसांनी २१ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमिन भाषासाहब शेख (वय ३६, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी त्यांची बजाज पल्सर मोटारसायकल (क्रमांक एमएच १४ एचएल ७१४०) दि. २६ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास तैवकल्ला मशीद, नेहरूनगर येथे रस्त्याच्या कडेला पार्क केली होती. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने मोटारसायकल चोरी करून नेली.
या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८३/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी आदित्य लोकेश कुमार (वय २१, रा. गढवाल रोड, थायमन्ना गुडी मंडी पेठजवळ, रायचूर, कर्नाटक) याला अटक केली. चोरीस गेलेल्या मोटारसायकलीबाबत पुढील तपास सुरू आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मेलार करीत असून, अधिक तपास संत तुकारामनगर पोलीस करीत आहेत.