Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»भोसरीत गुंतवणुकीवर १० टक्के मासिक परताव्याचे आमिष; ६४.८५ लाखांचा अपहार
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

भोसरीत गुंतवणुकीवर १० टक्के मासिक परताव्याचे आमिष; ६४.८५ लाखांचा अपहार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 23, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

भोसरी : गुंतवणुकीवर दरमहा १० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून तब्बल ८४ लाख ५१ हजार ६८८ रुपये जमा करून त्यापैकी ६४ लाख ८५ हजार ३४८ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार भोसरी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत भोसरी येथील जय गणेश साम्राज्य, गोदाऊन चौकातील कार्यालय क्रमांक १४२, जी ब्लॉक येथे हा प्रकार घडला. आरोपींनी ‘ग्रो कॅपिटल’ आणि ‘विश्वांजली व्हेंचर्स एलएलपी’ या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. भारतातून परदेशात विविध वस्तूंची आयात-निर्यात करणारी मोठी कंपनी असल्याचे सांगून एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास २० महिन्यांसाठी दरमहा १० टक्के नफा देण्याचे आश्वासन देण्यात आले.

जास्त परताव्याचे आमिष दाखवून फिर्यादी तसेच अन्य गुंतवणूकदारांकडून ऑनलाइन आणि रोख स्वरूपात एकूण ८४ लाख ५१ हजार ६८८ रुपये स्वीकारण्यात आले. त्यापैकी १९ लाख ६६ हजार ३४० रुपये परतावा म्हणून देण्यात आले. मात्र उर्वरित ६४ लाख ८५ हजार ३४८ रुपये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

याप्रकरणी विकी अशोक हनुमंते (वय ४१, रा. काळेवाडी, पुणे) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज अशोक पाटील (वय ४६, रा. नालवाडी, जि. वर्धा) याच्यासह तीन जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१६(५), ३(५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ मधील कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार दगडगावे करीत आहेत.

Post Views: 4
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमायक्रोसॉफ्ट टीम्स ग्रुपमध्ये घुसून कंपनीला ३० लाखांचा गंडा; भोसरीत सायबर फसवणुकीचा गुन्हा
Next Article शाळेच्या बससेवेचे ₹४.१४ लाख न दिल्याने फसवणुकीचा गुन्हा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दहीहंडी उत्सवात ध्वनीप्रदूषणाचा दणका; १६ डॉल्बी सिस्टीमवर पोलिसांची कारवाई

September 7, 2026

विनापरवाना DJ वाजवणाऱ्या तीन दहीहंडी मंडळांना बावधन पोलिसांचा दणका

September 7, 2026

खून, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे अन् गांजा तस्करी; एकाच दिवशी गुन्ह्यांची मालिका

September 4, 2026

एम.डी. आणि अफिम तस्करी करणारे दोघे जेरबंद

September 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?