Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»इन्स्टाग्रामवरून पिस्तुलांची विक्री; नांदेडच्या तरुणाला भोसरीत अटक
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

इन्स्टाग्रामवरून पिस्तुलांची विक्री; नांदेडच्या तरुणाला भोसरीत अटक

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संपर्क साधून अवैध अग्निशस्त्रांची विक्री करणाऱ्या एका पिस्तूल डीलरला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने भोसरी येथे गुरुवारी (दि. २०) रंगेहात अटक केली. आरोपीकडून दोन गावठी बनावटीच्या लोखंडी पिस्तुलांसह दोन जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मंगेश मालु कोकणे (वय २०, रा. मुगाव, ता. नायगाव, जि. नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत काम करत असून, वरकमाईसाठी अवैध पिस्तूल विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. तो मध्य प्रदेशातून सुमारे २५ हजार रुपयांना पिस्तूल खरेदी करून पिंपरी-चिंचवड परिसरात सुमारे ५० हजार रुपयांना विकत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी या कारवाईची माहिती दिली. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार गणेश सावंत, विनोद वीर आणि हर्षद कदम यांना नांदेड येथील ‘एम. के.’ नावाचा तरुण इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संपर्क साधून पिंपरी-चिंचवड परिसरात पिस्तूल विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी भोसरी येथील गावजत्रा मैदान परिसरात सापळा रचला. संशयितरीत्या आलेल्या मंगेश कोकणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता विक्रीच्या उद्देशाने आणलेली दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, रावसाहेब मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गणेश सावंत, विनोद वीर, हर्षद कदम, गणेश कोकणे, अशोक मरळ, गणेश हिंगे, चंद्रकांत गडदे, नितीन उमरजकर, नितीन लोखंडे, मोहसीन अत्तार, प्रविण कांबळे, ज्ञानेश्वर कोळगे, नागेश माळी आणि प्रकाश ननावरे यांच्या पथकाने केली.

Post Views: 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअवयवदान जनजागृतीतून ‘खरी मोक्षप्राप्ती’; पैलवान काळूराम लांडगे यांचा विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल सन्मान
Next Article दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने टपरी चालकाला मारहाण; चौघे ताब्यात
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दहीहंडी उत्सवात ध्वनीप्रदूषणाचा दणका; १६ डॉल्बी सिस्टीमवर पोलिसांची कारवाई

September 7, 2026

विनापरवाना DJ वाजवणाऱ्या तीन दहीहंडी मंडळांना बावधन पोलिसांचा दणका

September 7, 2026

खून, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे अन् गांजा तस्करी; एकाच दिवशी गुन्ह्यांची मालिका

September 4, 2026

एम.डी. आणि अफिम तस्करी करणारे दोघे जेरबंद

September 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?