उत्तर म्हाळुंगे,खेड प्रतिनिधी : भांबोली गावाच्या हद्दीत रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना दमदाटी करून विनापरवाना धारदार कोयते बाळगणाऱ्या दोघांविरुद्ध उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांबोली गावातील कमानीजवळ रात्री सुमारे १२.२० वाजता आरोपी अनिकेत बाळू रोकडे (वय २६, रा. स्मशानभूमीजवळ, भांबोली, ता. खेड) आणि राज बंडे (वय अंदाजे ३०, रा. भांबोली, ता. खेड) हे संशयास्पदरीत्या आढळून आले. त्यांच्याकडे विनापरवाना धारदार कोयते असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
दरम्यान, आरोपींनी रोहित राजू सातपुते (वय २६) आणि विजय मनोजकुमार कांबळे (वय २२), दोघेही रा. भांबोली, यांना तसेच रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपींकडे मारुती कंपनीची ईको कार (क्रमांक एमएच १४ आरयू ६१७९) असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई बाळासाहेब त्र्यंबक भिसे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)/१३५ तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम ३५१(३), ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
घटनेचा पुढील तपास उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.