पिंपरी प्रतिनिधी : देसाई हॉस्पिटलजवळील ज्योती बिल्डिंग परिसरातून पार्क करून लॉक केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी पहाटे दोन ते सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. पिंपरीतील सम्राट चौक परिसरातील ज्योती बिल्डिंग, सर्व्हे क्रमांक ३६/११, प्लॉट क्रमांक २ येथे फिर्यादी यांनी त्यांची मोटारसायकल पार्क करून लॉक केली होती. मात्र, अज्ञात व्यक्तीने स्वतःच्या फायद्यासाठी ती चोरून नेली.
या प्रकरणी अश्विनी दिलीप बंसल (वय ५१, व्यवसाय वकील) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा क्रमांक ३४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा क्रमांक क १४ २८३६ असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी करीत आहेत.