Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»बनावट पोलीस अधिकारी बनून ७१ वर्षीय निवृत्त व्यक्तीची १५ लाखांची फसवणूक
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

बनावट पोलीस अधिकारी बनून ७१ वर्षीय निवृत्त व्यक्तीची १५ लाखांची फसवणूक

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 19, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सर्वोच्च न्यायालयाचे बनावट पत्र पाठवून ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी; मनी लॉन्ड्रिंग व दहशतवादी कारवायांच्या नावाखाली रक्कम उकळली

पिंपळे गुरव, पुणे : पोलीस अधिकारी असल्याचे भासवून तसेच सर्वोच्च न्यायालयाचे बनावट व खोटे पत्र तयार करून एका ७१ वर्षीय निवृत्त व्यक्तीला दहशतवादी कारवाया, मनी लॉन्ड्रिंग आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवत तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळे गुरव परिसरात उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विष्णू महादेव धारे (वय ७१, रा. गजानन नगर, रस्ता क्रमांक २, पिंपळे गुरव, पुणे) यांना २ ते ६ ऑगस्ट २०२६ दरम्यान संशयितांनी संपर्क साधला. संशयितांनी आपण पोलीस अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी झाल्याचे सांगितले.

तसेच फिर्यादीविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगून अटकेची धमकी देण्यात आली. फिर्यादीची मालमत्ता आणि बँक खाती जप्त करण्यात येतील, अशी भीतीही दाखविण्यात आली.

यासाठी संशयितांनी सर्वोच्च न्यायालयाचे असल्याचे भासविणारे खोटे व बनावट पत्र तयार करून फिर्यादीला पाठविले. या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या फिर्यादीला एका विशिष्ट बँक खात्यात पैसे जमा करण्यास भाग पाडण्यात आले. त्यानुसार कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यात विविध व्यवहारांद्वारे एकूण ₹१५ लाख रुपये जमा करण्यात आले.

या प्रकरणात तीन मोबाईल क्रमांकांचा वापर करण्यात आल्याचे समोर आले असून, एका कोटक महिंद्रा बँक खात्याचाही वापर झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात संबंधित संशयितांसह इतर अनोळखी व्यक्तींचाही सहभाग असल्याचा संशय आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, बपोनि कोळी यांच्यासह पोलीस पथक तपास करीत आहे. संशयितांनी वापरलेले मोबाईल क्रमांक, बँक खाते तसेच पैशांच्या व्यवहारांचा तपास करून फसवणुकीच्या संपूर्ण रॅकेटचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन

पोलीस किंवा न्यायालयाच्या नावाने फोन करून अटक, मनी लॉन्ड्रिंग किंवा दहशतवादी कारवायांशी संबंधित गुन्ह्यांची भीती दाखवून पैसे मागितल्यास नागरिकांनी घाबरून कोणतीही रक्कम जमा करू नये. अशा प्रकारच्या संशयास्पद कॉलची तातडीने संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Post Views: 9
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआळंदीत लोखंडी सळईने बेदम मारहाण; एकाचा मृत्यू
Next Article शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने ९.३८ लाखांचा गंडा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दहीहंडी उत्सवात ध्वनीप्रदूषणाचा दणका; १६ डॉल्बी सिस्टीमवर पोलिसांची कारवाई

September 7, 2026

विनापरवाना DJ वाजवणाऱ्या तीन दहीहंडी मंडळांना बावधन पोलिसांचा दणका

September 7, 2026

खून, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे अन् गांजा तस्करी; एकाच दिवशी गुन्ह्यांची मालिका

September 4, 2026

एम.डी. आणि अफिम तस्करी करणारे दोघे जेरबंद

September 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?