Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»पीएमपीएमएलच्या उत्पन्नात विक्रमी वाढ; २.५१ कोटींचा टप्पा पार
पुणे

पीएमपीएमएलच्या उत्पन्नात विक्रमी वाढ; २.५१ कोटींचा टप्पा पार

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांच्या नियोजनबद्ध कार्यक्षमतेला सांघिक प्रयत्नांची जोड

पुणे, दि.१८ ऑगस्ट २०२६ : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) दि.१७ ऑगस्ट रोजी उत्पन्नाच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ₹ २ कोटी ५१ लाख १५ हजार ६४ रुपयांचे विक्रमी एकूण उत्पन्न मिळविले. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांच्या नियोजनबद्ध कार्यक्षम नेतृत्वाला चालक, वाहक, वाहतूक निरीक्षक, चेकर, डेपो प्रशासन तसेच विविध विभागांच्या सांघिक प्रयत्नांची जोड मिळाल्याने महामंडळाच्या उत्पन्नवाढीस मोठी चालना मिळाली आहे.

दि.१७ ऑगस्ट रोजी पीएमपीएमएलला तिकीट रोख उत्पन्नातून ₹ १ कोटी ५९ लाख १६ हजार ४०३, पासेसमधून ₹ ५७ लाख २ हजार ७३०, पुणे दर्शन व पर्यटनातून ₹ १ लाख ४५ हजार, तर मोबाईल ॲपमधून ₹ ३३ लाख ५० हजार ९३१ रुपये उत्पन्न प्राप्त झाले. या सर्वांचा एकत्रित आकडा ₹ २ कोटी ५१ लाख १५ हजार ६४ इतका आहे

या दिवशी दोन्ही शिफ्टची सरासरी धरता एकूण १,७६७ बस रस्त्यावर कार्यरत होत्या. यामध्ये PMPMLच्या ६५३ पैकी ५२४ बस, तर भाडेतत्त्वावरील १३८८ पैकी १२४३ बस मार्गावर धावत होत्या. उपलब्ध बसचा प्रभावी वापर करून प्रवाशांना अधिकाधिक आणि दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यावर भर देण्यात आला.

महामंडळाच्या या उल्लेखनीय कामगिरीत प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याचा मोलाचा वाटा आहे. एकजुटीने केलेले नियोजन, शिस्तबद्ध कामकाज, वेळेचे काटेकोर नियोजन, प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वर्तन आणि उत्पन्नवाढीची सकारात्मक भावना यामुळे ही यशस्वी कामगिरी साध्य झाली.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाची तूट कमी करण्यासाठी विविध पातळ्यांवर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. उत्पन्नवाढीसोबतच खर्चावर नियंत्रण, उपलब्ध साधनसामग्रीचा कार्यक्षम वापर आणि प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्यावर विशेष भर दिला जात आहे.

“आपली सेवा – आपली जबाबदारी, आपले उत्पन्न – महामंडळाची प्रगती!” ही भावना मनात ठेवून आगामी काळात दररोजच्या उत्पन्नात आणखी वाढ करून ₹ २.५१ कोटींच्या पुढे नवा विक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रत्येक बस, प्रत्येक फेरी आणि प्रत्येक प्रवासी हा महामंडळाच्या उत्पन्नवाढीचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे सर्व अधिकारी, चालक-वाहक, कर्मचारी आणि संबंधित घटकांनी अधिक जबाबदारीने, प्रामाणिकपणे व उत्साहाने काम करून PMPMLच्या आर्थिक बळकटीकरणास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल PMPMLच्या सर्व अधिकारी, चालक-वाहक, कर्मचारी आणि संबंधित घटकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.

“एकत्र येऊया… अधिक सेवा देऊया… अधिक उत्पन्न आणूया… PMPMLला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवूया!”

Post Views: 15
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकामगार कल्याण मंडळाच्या पिंपरी केंद्रात ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Next Article पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी घटनांना आळा घालण्याचे पोलिसांसमोर आव्हान; सायबर फसवणुकीत तब्बल २.२० कोटींचा गंडा
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ चे दिमाखात उद्घाटन

September 7, 2026

दहीहंडीतील लावणीवरून राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा!

September 7, 2026

धनगर ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?