Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»राजस्थानपर्यंत माग काढत सायबर फसवणुकीतील मुख्य आरोपीला अटक
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

राजस्थानपर्यंत माग काढत सायबर फसवणुकीतील मुख्य आरोपीला अटक

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 17, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची नऊ महिन्यांची अथक तपासमोहीम; निवृत्त बँक अधिकाऱ्याची २ कोटी १४ लाख ७० हजारांची फसवणूक

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : पोलीस अधिकारी असल्याचे भासवून एका निवृत्त बँक अधिकाऱ्याला अटक करण्याची भीती दाखवत तब्बल २ कोटी १४ लाख ७० हजार ३५८ रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली. तब्बल नऊ महिन्यांच्या अथक तपासानंतर ही कारवाई करण्यात आली असून, राजेंद्र गणराज नागर (वय ३२, रा. जलखोडा, ता. नैनवा, जि. बूंदी, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४८/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील रक्कम मोठी असल्याने पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आरोपीचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले होते.

फिर्यादी हे सेवानिवृत्त बँक अधिकारी आहेत. आरोपींनी स्वतःची ओळख पोलीस अधिकारी म्हणून करून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यांची माहिती मिळवून त्यांच्या खात्यांमध्ये पीएफआय संघटनेशी संबंधित पैसे जमा झाल्याचे सांगितले.

या कथित व्यवहारामुळे अटक होण्याची भीती दाखवून आरोपींनी बनावट पोलीस कागदपत्रे व नोटिसांचा वापर केला. बँक खाती आणि एफडीतील रक्कम ‘पडताळणी’च्या नावाखाली विविध खात्यांमध्ये वर्ग करण्यास सांगितले. पडताळणी झाल्यानंतर पैसे परत केले जातील, असे सांगून आरोपींनी तब्बल २,१४,७०,३५८ रुपये विविध खात्यांमध्ये वर्ग करून घेतले.या प्रकरणी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान आरोपींनी फसवणुकीची रक्कम प्राप्त करण्यासाठी विविध बँकांमधील सहा खात्यांचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. संबंधित बँकांकडून प्राप्त झालेल्या माहितीचे तांत्रिक व आर्थिक विश्लेषण करण्यात आले.

त्यावेळी M/s Sultan Construction and Material Suppliers या नावाने असलेल्या आयसीआयसीआय बँक खात्यात गुन्ह्यातील ४९ लाख २० हजार २०० रुपये जमा झाल्याचे समोर आले. त्यापैकी ३८ लाख रुपये पुढे बँक ऑफ बडोदा खात्यात वर्ग करण्यात आले. त्यानंतर ही रक्कम धनादेशाद्वारे काढण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.

सदर बँक खाते राजेंद्र गणराज नागर याच्या नावावर असल्याचे बँक अभिलेखातून स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावून तपासासाठी हजर राहण्यास सांगितले. मात्र, तो तपासासाठी हजर झाला नाही. त्याचा मोबाईलही बंद असल्याचे आढळून आले.

त्यानंतर पोलिसांनी बँकेकडील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल क्रमांकाचा सीडीआर आणि तांत्रिक माहिती यांचे बारकाईने विश्लेषण केले. सीसीटीव्हीमध्ये आरोपीने स्वतः बँकेतून रक्कम काढल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक तपासातून आरोपी राजस्थानमधील बूंदी जिल्ह्यातील लाखेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवून ८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी एक वाजता राजेंद्र नागर याला अटक करण्यात आली.

अटकेनंतर आरोपीची चौकशी केली असता त्याने अरविंद उर्फ राजा याच्या मदतीने गुन्ह्यातील रक्कम विविध बँक खात्यांमध्ये प्राप्त करून तिची विल्हेवाट लावल्याची माहिती दिली. अरविंद उर्फ राजा याचे पूर्ण नाव व पत्ता अद्याप निष्पन्न झालेला नसून, त्याचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त, सायबर व आर्थिक गुन्हे रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकडे तसेच पोलीस अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.गुन्ह्यातील इतर आरोपी तसेच आर्थिक व्यवहारांशी संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचंद्रकांत ख्याले यांचा ‘राज्यस्तरीय उड्डाण पुरस्काराने’ सन्मान
Next Article Next Post
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दहीहंडी उत्सवात ध्वनीप्रदूषणाचा दणका; १६ डॉल्बी सिस्टीमवर पोलिसांची कारवाई

September 7, 2026

विनापरवाना DJ वाजवणाऱ्या तीन दहीहंडी मंडळांना बावधन पोलिसांचा दणका

September 7, 2026

खून, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे अन् गांजा तस्करी; एकाच दिवशी गुन्ह्यांची मालिका

September 4, 2026

एम.डी. आणि अफिम तस्करी करणारे दोघे जेरबंद

September 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?