Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»
पिंपरी चिंचवड

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 17, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरात वास्तव्यास असलेल्या खानदेशवासीयांची संस्कृती, परंपरा आणि धार्मिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या **‘भव्य खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२६’**ची जय्यत तयारी सुरू झाली आहे. खानदेश सार्वजनिक कानबाई उत्सव मंडळाच्या वतीने २२ ते २४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवाच्या तयारीनिमित्त शिवनगरी येथील तुळजाभवानी मंदिरात नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या तीन दिवसीय उत्सवासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री संजय सावकारे, मंत्री जयकुमार रावल यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

पारंपरिक ‘सप्ताह पूजनाने’ उत्सवाचा शुभारंभ

शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड येथील तुळजाभवानी मंदिरात ‘सप्ताह पूजन’ अर्थात गहू दळण्याचा पारंपरिक धार्मिक विधी होणार आहे. या कार्यक्रमाने उत्सवाची औपचारिक सुरुवात होईल.

कानबाई माता आगमनाची भव्य मिरवणूक

रविवार, २३ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी येथून शुभम गार्डन, वाल्हेकरवाडीपर्यंत कानबाई माता आगमनाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिरपूर येथील प्रसिद्ध ‘गोल्डन बँड’ आणि अमळनेर येथील ‘राधेकृष्णा बँड’ हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.

मिरवणुकीत महिलांनी कलश घेऊन, तर पुरुषांनी पारंपरिक खानदेशी वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सायंकाळी ७ वाजता शुभम गार्डन येथे कानबाई मातेची स्थापना, पूजन व उत्सवाचा उद्घाटन सोहळा होणार असून, यावेळी मान्यवरांचा सत्कार आणि मनोगतेही आयोजित करण्यात आली आहेत.

त्यानंतर रात्री ८ वाजल्यापासून भाविकांसाठी कानबाई मातेचे दर्शन व महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. रात्री ८ ते १० या वेळेत खानदेश फ्रेंड सर्कल ग्रुप (शिरपूर, धुळे, पुणे) यांच्या कलाकारांसह लोकप्रिय गायक सागर देशमुख, दिलीप बाशिंगे, कुणाल महाराज आणि दिनेश बाशिंगे यांच्या सहभागातून कानबाई मातेच्या गीतांचा भव्य संगीतमय कार्यक्रम रंगणार आहे.

जाधव घाटावर होणार विसर्जन सोहळा

सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता शुभम गार्डन, वाल्हेकरवाडी येथून जाधव घाट, रावेत या ठिकाणी कानबाई माता विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. पारंपरिक वाद्यांचा गजर आणि शिरपूरच्या ‘गोल्डन बँड’च्या सहभागामुळे विसर्जन मिरवणुकीलाही विशेष रंगत येणार आहे.

विविध समाज संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग

या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी खान्देश मराठा मंडळ, मराठा पाटील समाज मंडळ, गुजर स्नेह वर्धिनी, केदारेश्वर प्रतिष्ठान, खान्देश तिळवण तेली समाज मंडळ, लेवा पाटीदार समाज मंडळ, खानदेश माळी महासंघ, संतसेना महाराज खान्देश नाभिक मंडळ, भारतीय बहुजन विकास समिती, खानदेश अहिराणी कस्तुरी मंच, आहिरे मराठा मंडळ, वारी समाज मंडळ, सोनार समाज मंडळ, धनगर समाज मंडळ, राजपूत समाज मंडळ, महाराणा मित्र मंडळ, कुंभार समाज मंडळ, बडगुजर समाज मंडळ, वंजारी समाज मंडळ, शिंपी समाज मंडळ, खानदेश लाड शाखीय वाणी समाज मंडळ, क्षत्रिय माळी समाज मंडळ, कासार समाज मंडळ, लोहार समाज मंडळ, अखिल टोकरे कोळी समाज मंडळ, सुतार समाज मंडळ आणि कानबाई सेवा फाउंडेशन (खानदेश) यांच्यासह शहरातील खानदेश समाजबांधव व भगिनींचा सक्रिय सहभाग आहे.

“पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या खानदेशवासीयांना आपली समृद्ध संस्कृती व परंपरा एकाच छताखाली अनुभवता यावी, हा या महोत्सवामागील मुख्य उद्देश आहे. सर्व समाजबांधव उत्साहाने तयारी करत असून, बाप्पा आणि देवीच्या कृपेने हा महोत्सव भव्यदिव्य स्वरूपात पार पडेल. या माध्यमातून संपूर्ण खानदेश परिवार एकत्र येऊन एकोपा आणि आनंदाचा संदेश देईल,” अस

……श्री.नामदेव ढाके संयोजन समिती प्रमुख  

Post Views: 2
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराजस्थानपर्यंत माग काढत सायबर फसवणुकीतील मुख्य आरोपीला अटक
Next Article पिंपरी-चिंचवडमध्ये ‘खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२६’ची जय्यत तयारी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

राजवाडेनगरातील ७४०० चौ. फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

September 7, 2026

थोर क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?