Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात २२ दुचाकी चोरी; १२.९० लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात २२ दुचाकी चोरी; १२.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 16, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-१ची दमदार कारवाई; सुशिक्षित तरुणाला अटक, चोरीचे २२ गुन्हे उघड

पिंपरी, दि. १६ ऑगस्ट २०२६ : कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या मोहापायी मोटारसायकली चोरी करून त्या परराज्यातील व जिल्ह्यातील व्यक्तींना विक्री करणाऱ्या एका ३३ वर्षीय तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून विविध कंपन्यांच्या तब्बल २२ महागड्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, सुमारे १२ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण परिसरातील दुचाकी चोरीचे २२ गुन्हे उघडकीस आले आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

पिंपरी पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोताळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे तसेच पोलीस कर्मचारी विजय जानराव, केशव चेपटे आणि तेजस भालचिम यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.

३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले

चोरट्याचा माग काढण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळापासून आरोपीच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरील तब्बल २५० ते ३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. आरोपी मुख्य रस्त्यांचा वापर न करता वारंवार मार्ग बदलून आडरस्त्याने जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सातत्याने सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण आणि पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली.

सचिन पांडुरंग मरळे (वय ३३, सध्या रुई, ता. बारामती, जि. पुणे; सध्या जुनी सांगवी, पुणे येथे भाड्याने राहणार) असे आरोपीचे नाव आहे.

दरम्यान, आरोपीचा शोध घेत असताना पोलिसांना खबऱ्यामार्फत त्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. पोलिसांचा शोध सुरू असल्याची चाहूल आरोपीला लागल्याने तो मोटारसायकलवरून निघून जात होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून शिताफीने त्याला चोरीच्या मोटारसायकलीसह ताब्यात घेतले.

इलेक्ट्रिशियन कोर्सदरम्यान झालेल्या ओळखीचा गैरफायदा

आरोपीकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून २२ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. साधारण एक ते दीड वर्षांपूर्वी इलेक्ट्रिशियनचा कोर्स करत असताना झालेल्या ओळखींचा त्याने या गैरप्रकारासाठी वापर केला.

चोरीच्या मोटारसायकली विकताना त्या बनावट कागदपत्रांच्या अथवा बँकेच्या लिलावातून मिळालेल्या फायनान्सच्या गाड्या असल्याचे खोटे सांगून विविध व्यक्तींना विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

चोरीच्या गाड्या खरेदी करणाऱ्यांवरही कारवाई

पोलिसांच्या तपासात काही व्यक्तींनी वाहनाची कागदपत्रे किंवा मूळ मालकीची खात्री न करता स्वतःच्या फायद्यासाठी चोरीच्या मोटारसायकली खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे चोरीची मालमत्ता स्वीकारल्याप्रकरणी संबंधितांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

आरोपीने चोरीच्या मोटारसायकली पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, बीड आणि रायगड जिल्ह्यातील व्यक्तींना विकल्याचे तपासात समोर आले आहे. काही वाहनांना खरेदीदार न मिळाल्याने आरोपीने त्या लपवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी या वाहनांचाही शोध घेऊन त्या जप्त केल्या.

या गुन्ह्यांचा झाला उलगडा

तपासादरम्यान संत तुकारामनगर, पिंपरी, चतु:शृंगी, हिंजवडी, सांगवी, दापोडी, शिरूर आणि भोसरी पोलीस ठाण्यांमधील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये पिंपरी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्र. ४४७/२०२६ यासह एकूण २२ गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यापैकी १६ गुन्ह्यांची माहिती पोलिसांनी जाहीर केली असून उर्वरित सहा मोटारसायकलींबाबतचा तपास सुरू आहे.

या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यास मोठी मदत होणार असून, चोरीची वाहने खरेदी करणाऱ्यांवरही पोलिसांची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleतिरंग्याच्या साक्षीने संत तुकाराम नगर दुमदुमले; यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅली
Next Article मातंग जनआक्रोश महामोर्चामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारी वाहतूक बदल
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

दहीहंडी उत्सवात ध्वनीप्रदूषणाचा दणका; १६ डॉल्बी सिस्टीमवर पोलिसांची कारवाई

September 7, 2026

विनापरवाना DJ वाजवणाऱ्या तीन दहीहंडी मंडळांना बावधन पोलिसांचा दणका

September 7, 2026

खून, ऑनलाइन फसवणूक, सायबर गुन्हे अन् गांजा तस्करी; एकाच दिवशी गुन्ह्यांची मालिका

September 4, 2026

एम.डी. आणि अफिम तस्करी करणारे दोघे जेरबंद

September 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?