Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»जनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण; रिपब्लिकन पक्ष (आठवले)चा पुण्यात महामोर्चा
पुणे

जनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण; रिपब्लिकन पक्ष (आठवले)चा पुण्यात महामोर्चा

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे, प्रतिनिधी : अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाची अंमलबजावणी राष्ट्रीय जातनिहाय जनगणना पूर्ण होऊन प्रत्येक समाजघटकाची अचूक लोकसंख्या समोर आल्यानंतरच करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात आला. भर पावसात निघालेल्या या मोर्चात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अनुसूचित जातीतील ५९ समाजघटकांचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू झालेल्या मोर्चात सामाजिक ऐक्य, समान हक्क आणि न्याय्य उपवर्गीकरणाच्या मागणीच्या घोषणा देण्यात आल्या. बौद्ध समाजासह अनुसूचित जाती-जमातींतील विविध समाजघटकांनी एकजुटीचे दर्शन घडविले.

मोर्चात पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष कुणाल न्हावळकर, पुणे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, महिला आघाडी अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, प्रदेश उपाध्यक्ष हुलगेश चलवादी यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले.

यावेळी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, अनुसूचित जातींतील ५९ समाजघटकांमध्ये सामाजिक ऐक्य अबाधित राहणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही समाजघटकामध्ये मतभेद किंवा दुरावा निर्माण होणार नाही, यासाठी उपवर्गीकरणाची प्रक्रिया राष्ट्रीय जातीय जनगणना पूर्ण झाल्यानंतरच राबविण्यात यावी. जनगणनेतून प्रत्येक समाजघटकाची अचूक लोकसंख्या समोर आल्यानंतरच लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय्य निर्णय घेणे शक्य होईल.

नेत्यांनी यावेळी नमूद केले की, अनुसूचित जातींतील विविध समाजघटकांनी सामाजिक न्याय, समान हक्क आणि आरक्षणासाठी अनेक दशकांपासून संयुक्तपणे संघर्ष केला आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घाईघाईने न घेता वस्तुनिष्ठ आकडेवारीच्या आधारे घेणे आवश्यक आहे. राज्यातील उर्वरित ५८ अनुसूचित जातींनाही शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी मिळाव्यात, अशी पक्षाची भूमिका असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

तसेच, २०२७ च्या जनगणनेनंतर उपलब्ध होणाऱ्या लोकसंख्येच्या आकडेवारीच्या आधारे अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या रचनेचाही पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

मोर्चाच्या माध्यमातून, अनुसूचित जातींतील ५९ समाजघटकांची अचूक लोकसंख्या निश्चित होण्यापूर्वी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी केल्यास समाजामध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सामाजिक सलोखा आणि ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी जनगणनेनंतरच लोकसंख्येच्या प्रमाणात उपवर्गीकरण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमातंग समाजाच्या अ-ब-क-ड उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ लातूरमध्ये भव्य महामोर्चा
Next Article मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग १९ मध्ये भव्य रक्तदान शिबिर; १५९ युनिट रक्तसंकलन
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या तिसऱ्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी

September 23, 2026

गणपती बाप्पांशी ‘द ब्लेस्ड वन्स’च्या विशेष मुलांचे अनोखे नाते

September 18, 2026

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

September 18, 2026

भीमाशंकरच्या विकासाला आता ‘बुलेट ट्रेन’चा वेग!

September 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?