Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

October 2, 2026

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»‘तारपा’साठीच आमची वंशावळ : भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावना
पुणे

‘तारपा’साठीच आमची वंशावळ : भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावना

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

रुद्रांग वाद्यपथक वादकांकडून पद्मश्री तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांचा सन्मान

ढोल-ताशा वादक संस्कृती कडून पद्मश्री तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांचा सन्मान

पुणे प्रतिनिधी : आमचा पणजोबा, नवश्या, आजोबा धाकल्या हे तारपा वाद्य वाजवायचे. त्यानंतर धाकल्याचा मुलगा लाडक्या, नि लाडक्याचा मुलगा मी, भिकल्या, तारपा वाजवतो. हे वाद्य आमची वंशावळ आहे. आता माझ्या नातू, पणतू शिकत आहेत. त्यांच्याबरोबर साठ-सत्तर लोक शिकवले, अशी भावना प्रसिद्ध तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांनी व्यक्त केली.देवाने आपल्याला जन्म दिला. मनाला विचारून आपण विचार करायचा असतो. विचारांनी आचार केला, तरच विकास होतो, असेही त्यांनी सांगितले.रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्ती निमित्त आयोजित वाद्यपूजन सोहळ्याप्रसंगी पद्मश्री तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांचा सत्कार यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित वाद्यपूजन सोहळ्यात आमदार हेमंत रासने, दिपकभाऊ नागपुरे, नगरसेवक राजेंद्र काकडे, नगरसेवक अपूर्व खाडे, नगरसेविका पुजा जागडे, अभिनेते रमेश परदेशी(पिट्याभाई ), नितीन पंडीत, आशिष कांटे, देवेंद्र वडके, अमित पळसकर,शिरीष थिटे, गणेश देशपांडे, मयुर ढमाले, यांच्यासह शहरातील विविध वाद्यपथकांतील, गणेशोत्सव मंडळांतील पदाधिकारी उपस्थित होते. याच कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष अमर भालेराव यांनी पद्मश्री तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांची माहिती आणि ट्रस्टच्या वतीने घेण्यात येणार्‍या ‘इन्स्टाग्राम रील’ स्पर्धेची माहिती दिली.

पुण्याच्या गणेशोत्सवाची ख्याती जगभर आहे आणि ढोल-ताशा ही पुण्याची संस्कृती आहे. आम्ही ढोल-ताशा वादक आहोत म्हणून रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्ती निमित्त एका संस्कृतीकडून आणि वादकाकडून दूसर्‍या वादक संस्कृतीचा सन्मान व्हावा याच उद्देशाने पद्मश्री तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांचा सत्कार करण्यात आला, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अमर भालेराव यांनी दिली.सदर कार्यक्रमाचे आयोजन ट्रस्ट अध्यक्ष अमर भालेराव ,श्रीनिवास निगडे ,अमोल शुक्ल ,तुषार दामगुडे ,अमित घुले ,निलेश वावरे यांनी केले आणि ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी मार्गदर्शन केले . महाराष्ट्राची संस्कृती जतन करण्याचे कार्य आपलेच आहे, तेच कार्य आम्ही केले आहे.

धिंडा म्हणाले, आमचा तारपा देवासाठी वाजतो. देवकार्याचं वाद्य आहे. हे वाद्य श्वासाने वाजतं. वारा येतो, तेव्हा झाड हलतं, तसं तारप्याला श्वास दिला की ते वाजतं. माडाचं पान, दोन बांबू आणि त्याला दुधी जोडलेली, असं हे वाद्य बनवलं जातं. तारप्यात नर आणि मादी आहे. शरीराला जेवढा श्वास, तेवढा श्वास या दोन्हींनाही घालायचा.

गणेशोत्सवाला १३५ वर्षांची भव्य परंपरा आहे. सुरुवातीला कार्यकर्ते स्वतः मंडप घालायचे, सजावट करायचे. लोकवर्गणी केली जायची. दोन महिने आधी उत्सव आल्याची जाणीव व्हायची. आता वाद्यपथकांची उद्घाटने झाली की, गणेशोत्सव आला असे वाटते. प्रत्येक वेळी टप्पा बदलत गेला. या काळात धर्म-संस्कृती-परंपरा जपण्याचे काम गणेशोत्सवाने केले आहे, असे मत रासने यांनी व्यक्त केले.

Post Views: 15
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराजवाडा अप्पर तहसीलदार कार्यालय परिसर त्वरित स्वच्छ करा; ह्यूमन राइट्स असोसिएशनची जोरदार मागणी
Next Article नॉव्हेल इंटरनॅशनल शाळेचा दहावीचा निकाल – शंभर टक्के यशाची परंपरा कायम
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या तिसऱ्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी

September 23, 2026

गणपती बाप्पांशी ‘द ब्लेस्ड वन्स’च्या विशेष मुलांचे अनोखे नाते

September 18, 2026

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

September 18, 2026

भीमाशंकरच्या विकासाला आता ‘बुलेट ट्रेन’चा वेग!

September 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अहिल्यानगर

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

अहिल्यानगर, रुई, (राहता) प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त रुई, ता. राहाता,…

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?