Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»आधुनिक पुण्याच्या दिशेने मोठी झेप; तीन उन्नत मार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन, २०३० पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ होणार – मुख्यमंत्री फडणवीस
पुणे

आधुनिक पुण्याच्या दिशेने मोठी झेप; तीन उन्नत मार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन, २०३० पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ होणार – मुख्यमंत्री फडणवीस

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे प्रतिनिधी : पुणे शहर हे भविष्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) आणि जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) प्रमुख हब बनणार असून, सन २०३० पर्यंत देशातील सर्वाधिक आधुनिक शहर आणि विकासाचे प्रमुख ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून उदयास येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

गणेश कला क्रीडा मंच येथे पुणे–शिरूर, तळेगाव–चाकण–शिक्रापूर आणि हडपसर–यवत या तीन महत्त्वपूर्ण उन्नत मार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी राज्य शासनाने पुणे–शिरूर, तळेगाव–चाकण–शिक्रापूर आणि हडपसर–यवत या तीन उन्नत मार्ग प्रकल्पांना गती दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ (BOT) तत्त्वावर हे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.

या नाविन्यपूर्ण प्रकल्पांमधून शासनाला अनुक्रमे ५०० कोटी, ३०० कोटी आणि १५० कोटी रुपये असा एकूण ९५० कोटी रुपयांचा आगाऊ निधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या प्रमुख मार्गांवरील वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भविष्यातील सार्वजनिक वाहतुकीचा विचार करून या तिन्ही उन्नत मार्गांवर पुढील काळात मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. त्यामुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होऊन शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleलक्ष्मीबाई टोपीवाला कन्या शाळेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश; १० वृक्षांची लागवड
Next Article हिंजवडीत ७ किलो अफू व डोडा चुरा जप्त; एकाला अटक, साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या तिसऱ्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी

September 23, 2026

गणपती बाप्पांशी ‘द ब्लेस्ड वन्स’च्या विशेष मुलांचे अनोखे नाते

September 18, 2026

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

September 18, 2026

भीमाशंकरच्या विकासाला आता ‘बुलेट ट्रेन’चा वेग!

September 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?