लक्ष्मीबाई टोपीवाला कन्या शाळेत ह्यूमन राईट असोसिएशनतर्फे वृक्षारोपण
मालवण, प्रतिनिधी संतोष नाईक : पर्यावरण संवर्धन आणि हरित उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कोकण विभाग, सिंधुदुर्ग-मालवण तालुक्याच्या वतीने लक्ष्मीबाई टोपीवाला कन्या शाळेच्या परिसरात १० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
या उपक्रमात संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, जिल्हा महिला संघटक सौ. मिनल पार्टे, मालवण तालुकाध्यक्ष प्रमोद कांडरकर, उपाध्यक्ष महेश मयेकर, निरीक्षक संदेश फाटक, महिला संघटक (शहरी व ग्रामीण) मुक्ता रजपूत, सौ. सीमा धुरी, कार्याध्यक्ष सुभाष प्रभू खानोलकर, सदस्य सीलिया डिया उपस्थित होते.
तसेच कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ, मालवणचे सहसचिव संदेश कोयंडे, कोषाध्यक्ष नंदन देसाई, लक्ष्मीबाई टोपीवाला कन्या शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण शिंदे, सहशिक्षक प्रवीण साबळे, कनिष्ठ लिपिक आनंद नाईक आणि शिपाई महादेव गावकर यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदविला.
यावेळी उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करत प्रत्येकाने वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प व्यक्त केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
