Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन; महापालिकेत पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
पिंपरी चिंचवड

अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन; महापालिकेत पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 18, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, प्रतिनिधी : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस तसेच निगडी येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी बोलताना उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या दीड दिवसांच्या शालेय शिक्षणाच्या बळावर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्य, शाहिरी, पोवाडे आणि लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे मोठे कार्य उभे केले. आपल्या जिद्द, प्रतिभा आणि लेखणीच्या जोरावर त्यांनी मराठी साहित्यविश्वात अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या व्यापक विचारांचा वारसा समाजाने जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

बाबर यांनी पुढे सांगितले की, अण्णा भाऊ साठे यांनी वंचित, शोषित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या वेदना आपल्या साहित्याद्वारे मांडत त्यांना न्याय आणि स्वाभिमानासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. *’फकीरा’*सारख्या अजरामर कादंबरीतून त्यांनी सामाजिक परिवर्तनाचा विचार मांडला, तर आपल्या शाहिरीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा गौरव देश-विदेशात पोहोचविला. सामाजिक समता, बंधुता, न्याय आणि मानवी मूल्यांचा त्यांनी दिलेला संदेश आजही समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास नगरसेविका अनुराधा गोरखे, उपायुक्त आण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य भगवान शिंदे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश अवघडे, जेजुरी संस्थानचे विश्वस्त अनिल सौदंडे, सामाजिक व विविध संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि समाजप्रबोधनाच्या कार्याचा गौरव करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमीरा रोडच्या ‘वेलमोरा स्पा’वर पोलिसांची धाड; दोन व्यवस्थापक अटकेत, मालक फरार
Next Article लक्ष्मीबाई टोपीवाला कन्या शाळेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश; १० वृक्षांची लागवड
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?