Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

October 2, 2026

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»अहिल्यानगरमध्ये वंचितांचा एल्गार! अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी सकल मातंग समाजाचा भव्य महामोर्चा संपन्न
पुणे

अहिल्यानगरमध्ये वंचितांचा एल्गार! अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी सकल मातंग समाजाचा भव्य महामोर्चा संपन्न

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे,१७ जुलै  : अनुसूचित जातींच्या (SC) आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे आणि वंचित उपजातींना त्यांचा हक्क मिळवून द्यावा, या प्रमुख मागणीसाठी अहिल्यानगर येथे सकल मातंग समाजाच्या वतीने एक ऐतिहासिक आणि भव्य महामोर्चा काढण्यात आला. आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे चौक, लालटाकी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या महामोर्चामध्ये समाजबांधवांचा, तरुण कार्यकर्त्यांचा आणि माता-भगिनींचा अभूतपूर्व जनसागर उसळला होता. ‘उपवर्गीकरण लागू झालेच पाहिजे’, ‘सामाजिक न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणांनी संपूर्ण अहिल्यानगर परिसर दणाणून गेला होता.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ उपवर्गीकरणाची मागणी

सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा कायदेशीर अधिकार राज्य सरकारला बहाल केला आहे. या निर्णयामुळे वर्षानुवर्षे वंचित राहिलेल्या घटकांना सामाजिक न्यायाची संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मातंग समाजाला नोकरी, शिक्षण तसेच विविध शासकीय योजनांमध्ये अपेक्षित प्रतिनिधित्व न मिळाल्याने, सन १९८० पासून म्हणजेच गेल्या चार दशकांहून अधिक काळ उपवर्गीकरणाची ही मागणी सातत्याने केली जात आहे. सन २०२२ पासून विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि समाजातील मान्यवरांनी एकत्र येत ‘सकल मातंग समाज महाराष्ट्र’च्या माध्यमातून हा लढा अधिक व्यापक केला आहे.

आमदार अमित गोरखे यांची भूमिका

सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य शासनाने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत घेतलेल्या न्यायसंगत भूमिकेला आमचा खंबीर पाठिंबा आहे. मातंग समाज आणि इतर वंचित उपजातींना आरक्षणाचा खऱ्या अर्थाने आणि कायदेशीर लाभ मिळावा, हाच या ऐतिहासिक लढ्याचा मुख्य उद्देश आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत जोपर्यंत न्याय पोहोचत नाही, तोपर्यंत हा लढा असाच तीव्र गतीने पुढे सुरू राहील, अशी भूमिका आमदार अमित गोरखे यांची आहे.

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचित्तरंजन दासांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून न्यायासाठी लढा; केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांचे वकिलांना आवाहन
Next Article राज्यातील हजारो गावांमधील स्मशानभूमींचा प्रश्न आमदार अमित गोरखे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीमुळे अखेर मार्गी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या तिसऱ्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी

September 23, 2026

गणपती बाप्पांशी ‘द ब्लेस्ड वन्स’च्या विशेष मुलांचे अनोखे नाते

September 18, 2026

गणेशोत्सवानिमित्त ब्रह्माकुमारी बोपोडी सेवा केंद्रात श्री गणेश आरती

September 18, 2026

भीमाशंकरच्या विकासाला आता ‘बुलेट ट्रेन’चा वेग!

September 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अहिल्यानगर

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

अहिल्यानगर, रुई, (राहता) प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त रुई, ता. राहाता,…

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?