Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

November 22, 2026

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»महाराष्ट्र»राज्यातील हजारो गावांमधील स्मशानभूमींचा प्रश्न आमदार अमित गोरखे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीमुळे अखेर मार्गी
महाराष्ट्र

राज्यातील हजारो गावांमधील स्मशानभूमींचा प्रश्न आमदार अमित गोरखे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीमुळे अखेर मार्गी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 17, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड, : राज्यातील हजारो गावांमधील स्मशानभूमींचा प्रश्न आमदार अमित गोरखे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीमुळे अखेर मार्गी लागणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील अत्यंत संवेदनशील अशा ‘गाव तिथे स्मशानभूमी’ या विषयावर विविध वृत्तपत्रांमध्ये आता मोठ्या प्रमाणात बातम्या प्रसिद्ध होत असून प्रशासकीय पातळीवर खळबळ उडाली आहे. मात्र, राज्यातील शेकडो गावे अंत्यसंस्काराच्या मूलभूत सुविधेपासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव आमदार अमित गोरखे यांनी अगोदरच अधिवेशना दरम्यान लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात मांडले होते. आमदार गोरखे यांनी आधीच केलेल्या या चौफेर आणि यशस्वी पाठपुराव्यामुळेच आता शासन यावर कठोर पावले उचलण्यास भाग पडले आहे.

हक्काची जागा नसल्यामुळे मृतदेहाची विटंबना

अधिवेशनात तारांकित प्रश्नाच्या वेळी आमदार अमित गोरखे यांनी उपप्रश्न उपस्थित करत ग्रामीण भागातील जनतेची होणारी क्लेशदायक हेळसांड सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली होती. पावसाळ्यात किंवा कडक उन्हाळ्यात हक्काची जागा आणि शेड नसल्यामुळे मृतदेहाची विटंबना होते, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगत त्यांनी ‘गाव तिथे स्मशानभूमी’ या योजनेची केवळ कागदावर नव्हे तर जमिनीवर कठोर अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी केली होती.

सभागृहात सविस्तर चर्चा

आमदार अमित गोरखे यांनी उपस्थित केलेल्या या जनहितार्थ मुद्द्यावर सभागृहात सविस्तर चर्चा झाली होती. यावर बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले होते की, राज्यातील ८० टक्के गावांमध्ये स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध आहे, मात्र उर्वरित गावांचा प्रश्न तातडीने सोडवला जाईल. यासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर बैठका घेऊन, स्मशानभूमी नसलेल्या गावांची अंतिम यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. १५ जुलै रोजी यासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून यासाठी निधी वर्ग करण्यात येत आहे.

आमदार अमित गोरखे यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे राज्यातील हजारो गावांमधील अंत्यसंस्काराच्या जागेचा आणि शेडचा गंभीर प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामीण जनतेला त्यांच्या हक्काचा नागरी सन्मान मिळवून देण्यासाठी आमदार गोरखे यांनी घेतलेली ही भूमिका अत्यंत कौतुकास्पद आहे.

आमदार अमित गोरखे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शासनाने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय:

१. विकासनिधी रोखणार (ब्रेक): ज्या गावांमध्ये अद्याप स्मशानभूमी किंवा अंत्यसंस्कारासाठी शेड उपलब्ध नाही, तिथे इतर सौंदर्यकरण किंवा विकासकामांचा निधी रोखला जाईल आणि प्रथम स्मशानभूमी उभारणीला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.

२. डीपीसी (DPC) मधून निधीची तरतूद: जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून या कामांसाठी विशेष निधी वर्ग केला जाणार आहे.

३. सामूहिक स्मशानभूमीचा पर्याय: जागा उपलब्ध नसलेल्या गावांमध्ये शेजारील गावाशी समन्वय साधून दोन गावा मिळून एक सामूहिक स्मशानभूमी विकसित करण्याची मुभा शासनाने दिली आहे. ‘एक गाव, एक स्मशानभूमी’ योजना देखील प्रभावीपणे राबवली जाणार आहे.

४. गायरान व खाजगी जमिनींचा प्रश्न मार्गी लावणार: स्मशानभूमीसाठी शासकीय किंवा गायरान जमीन देण्याबाबत, तसेच गरज पडल्यास शासन स्तरावर भूसंपादन करून जागा उपलब्ध करून देण्याबाबत हायकोर्टाचे निर्देश तपासून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन शासनाने आमदार गोरखे यांना दिले होते.

आता या समस्येची भीषणता समोर येत असून, या जनहितार्थ आणि संवेदनशील मुद्द्याला सभागृहात वाचा फोडून शासनाला ठोस निर्णय घ्यायला लावणारे आमदार अमित गोरखे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न यामागे आहेत.

Post Views: 20
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअहिल्यानगरमध्ये वंचितांचा एल्गार! अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी सकल मातंग समाजाचा भव्य महामोर्चा संपन्न
Next Article पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय : १६ जुलै २०२६ रोजी दाखल प्रमुख गुन्हे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’

November 21, 2026

‘लाडक्या बहिणीं’च्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – मंत्री अदिती तटकरे

November 19, 2026

विधान परिषद निवडणुकांची आचारसंहिता संपली!

October 29, 2026

विधान परिषद आमदार अमित गोरखे यांच्या ताफ्याचा नाशिकमध्ये अपघात

September 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

नमो स्टील दुकानात चोरी; सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेला!

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 22, 20260

पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करून स्टेनलेस स्टील, तांबे, पितळ, अॅल्युमिनियमसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरट्यांनी पळविला भोसरी प्रतिनिधी:…

वाकडमध्ये भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; चालक फरार

November 22, 2026

मृत्यू; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कामगारांच्या सुरक्षेशी खेळ; चाकणमध्ये बांधकाम व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर

November 22, 2026

नेरलेतील दोन तरुणांना मारहाण प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाची गंभीर दखल

November 22, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?