Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

July 11, 2026

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»आळंदीत इंद्रायणी नदीला महापूर; चारही पूल पाण्याखाली, वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचे प्रशासनाचे आवाहन
पुणे

आळंदीत इंद्रायणी नदीला महापूर; चारही पूल पाण्याखाली, वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचे प्रशासनाचे आवाहन

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 6, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे (आळंदी) प्रतिनिधी……आळंदी शहरात इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. मावळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वडीवळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. परिणामी, नदीकाठच्या सिद्धबेट, गोपाळपुरा परिसरातील धर्मशाळांमध्ये पाणी शिरले असून शहरातील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत.

या परिस्थितीमुळे आळंदीचा बाह्य संपर्क पूर्णपणे तुटला असून सर्व पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पुलांचे कठडे तसेच नदीकाठावरील चेंजिंग रूमही पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत.

पूरामुळे विविध धर्मशाळा आणि दर्शन मंडपांमध्ये अडकलेल्या सुमारे २५० ते ४०८ वारकऱ्यांना आपत्कालीन यंत्रणांनी सुरक्षित स्थळी हलवले आहे. तसेच, काही नागरिकांच्या सुटकेचे प्रयत्नही युद्धपातळीवर सुरू आहेत.

आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिक गंभीर मानली जात आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत येत असतात. मात्र, पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनाने वारकरी, भाविक आणि नागरिकांना आळंदीकडे न येण्याचे आवाहन केले असून, जिथे आहात तिथेच सुरक्षित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने शाळा, महाविद्यालये आणि धर्मशाळांसह दहा इमारती तात्पुरत्या निवासासाठी अधिग्रहित करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील दोन दिवसांसाठी वारकऱ्यांच्या निवासाची पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यासाठी ६ जुलै २०२६ रोजी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता. त्यानंतर देहू-आळंदी परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांची व्यवस्था करणे शक्य नसल्याने, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित उपस्थितीत पार पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमुसळधार पावसाचा तडाखा; वाडा कोसळला, झाड पडले, अंडरपासमध्ये कार अडकली
Next Article मुसळधार पावसामुळे पवना नदीला पूर; बिर्ला रुग्णालयाजवळील पूल पाण्याखाली
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

“एवढाच निरोप सांगा पांडुरंगाला, परत पाठव देवा माझ्या विठ्ठलाला…!”

July 9, 2026

भावपूर्ण वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुण्याकडे प्रस्थान; आळंदीकर ग्रामस्थांचा अश्रुपूर्ण निरोप

July 9, 2026

आळंदीत वारकऱ्यांसह मारुती भापकर यांचे आंदोलन; इंद्रायणी नदीच्या ४४३ कोटींच्या प्रकल्पाला स्थगितीची मागणी

July 8, 2026

भीषण परिस्थिती! पुण्यात पहिल्याच पावसात अनेक भाग जलमय; राष्ट्रवादीचे नगरसेवक ग्राऊंड लेवलवर;थेट छातीएवढ्या पाण्यात उतरले; पूरस्थितीची केली पाहणी

July 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

‘ट्राफिक बडी’चा नागरिकांना मोठा दिलासा; जून महिन्यात १,६३८ वाहतूक तक्रारींचा ऑनलाइन निपटारा

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 11, 20260

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेची प्रभावी कारवाई; व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे नागरिकांना तात्काळ प्रतिसाद पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या…

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?