Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

July 10, 2026

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»आळंदीत वारकऱ्यांसह मारुती भापकर यांचे आंदोलन; इंद्रायणी नदीच्या ४४३ कोटींच्या प्रकल्पाला स्थगितीची मागणी
पुणे

आळंदीत वारकऱ्यांसह मारुती भापकर यांचे आंदोलन; इंद्रायणी नदीच्या ४४३ कोटींच्या प्रकल्पाला स्थगितीची मागणी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

‘नदी सुशोभीकरण नव्हे, आधी एसटीपी प्रकल्प उभारा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, उद्घाटन टाळण्याचे आवाहन

आळंदी, दि. ८ जुलै : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांच्या नेतृत्वाखाली श्रीक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदी वॉटर बॉडी (सरोवर) पुनर्जीवन प्रकल्पाविरोधात जनजागृती आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाद्वारे सुमारे ४४३.५१ कोटी रुपयांच्या इंद्रायणी नदी पुनर्जीवन प्रकल्पाला तातडीने स्थगिती देऊन संपूर्ण प्रकल्पाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात भापकर यांनी पिंपरी-चिंचवडमधील इंद्रायणी, पवना आणि मुळा नद्यांवरील नदी पुनर्जीवन प्रकल्पांवर हजारो कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचे नमूद केले आहे. या प्रकल्पांमुळे नद्यांचे नैसर्गिक स्वरूप, जैवविविधता आणि नदीपात्राचे अस्तित्व धोक्यात येणार असून हजारो वृक्षांची कत्तल होण्याची शक्यता असल्याचा आरोप त्यांनी केला.

भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, या प्रकल्पांच्या डीपीआरमध्ये पूरस्थिती कमी होण्याचा ठोस दावा नसून, नदी शुद्धीकरणापेक्षा सुशोभीकरण आणि सिव्हिल कामांवर अधिक भर देण्यात आला आहे. दुसरीकडे शहरात आवश्यक क्षमतेचे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात दूषित पाणी थेट नद्यांमध्ये सोडले जात असल्याने प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे हजारो कोटी रुपये नदी सुशोभीकरणावर खर्च करण्याऐवजी एसटीपी प्रकल्पांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

निवेदनात इंद्रायणी नदी प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेवरही गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत. स्थायी समितीच्या नियमित विषयपत्रिकेत विषय नसताना ऐनवेळी विषय समाविष्ट करून घाईघाईने मंजुरी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आठ निविदांपैकी पाच महाराष्ट्रातील ठेकेदारांना अपात्र ठरवून गुजरातमधील कंपनीची निविदा मंजूर करण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

आळंदी, देहू आणि चिंचवडगाव यांसारख्या तीर्थक्षेत्रांमध्ये आवश्यक त्या प्रमाणात सुशोभीकरण करण्यास हरकत नसली, तरी संपूर्ण नदीपात्राचे काँक्रीटीकरण किंवा मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करणे पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.

दरम्यान, आज आळंदी येथे झालेल्या जनजागृती आंदोलनात शुभम पांडे, नरेंद्रजी चुय, संतोष वाळके, विशाल भालेराव, संदीप बले यांच्यासह अनेक वारकरी सहभागी झाले. या आंदोलनाला उपस्थित वारकऱ्यांनी पाठिंबा दर्शविल्याचा दावा मारुती भापकर यांनी केला.

आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारने इंद्रायणी नदी वॉटर बॉडी पुनर्जीवन प्रकल्पाला स्थगिती देऊन त्याचा पुनर्विचार करावा तसेच इंद्रायणी, पवना आणि मुळा नद्यांच्या उगमापासून संगमापर्यंत प्रभावी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेला द्यावेत, अशी मागणी केली आहे.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शहराचा विभागनिहाय आराखडा तयार करणार-आयुक्त डॉ.सूर्यवंशी
Next Article मोशी कचरा डेपोत भीषण दुर्घटना! कचऱ्याच्या डोंगराचे भूस्खलन; तीन मजली इमारत गाडली, १९ जण अडकल्याची भीती
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

“एवढाच निरोप सांगा पांडुरंगाला, परत पाठव देवा माझ्या विठ्ठलाला…!”

July 9, 2026

भावपूर्ण वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुण्याकडे प्रस्थान; आळंदीकर ग्रामस्थांचा अश्रुपूर्ण निरोप

July 9, 2026

भीषण परिस्थिती! पुण्यात पहिल्याच पावसात अनेक भाग जलमय; राष्ट्रवादीचे नगरसेवक ग्राऊंड लेवलवर;थेट छातीएवढ्या पाण्यात उतरले; पूरस्थितीची केली पाहणी

July 6, 2026

आळंदीत इंद्रायणी नदीला महापूर; चारही पूल पाण्याखाली, वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचे प्रशासनाचे आवाहन

July 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

By Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 10, 20260

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी….निगडी येथील भक्ती-शक्ती उड्डाणपुलाच्या गोलाकार भागात अलीकडील मुसळधार पावसानंतर मोठे भगदाड पडल्याने वाहनचालक…

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

July 10, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

July 10, 2026

मोशी दुर्घटनास्थळी उपमहापौर शर्मिला बाबरांची पाहणी; बाधित कुटुंबीयांना दिला धीर

July 10, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?