Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

October 2, 2026

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात
पिंपरी चिंचवड

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 10, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. १० जुलै २०२६ : मोशी कचरा डेपो येथे दुर्घटनाग्रस्त झालेल्या इमारतीभोवतालचा मोठ्या प्रमाणावर असलेला मलबा हटवून इमारतीत प्रवेश करण्याचा मार्ग तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. अधिकची यंत्रसामग्री वापरून या कामाला गती देण्यात आली असून इमारतीत अडकलेल्या सुमारे ८ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.

सध्या इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे. शिवाय, इमारतीच्या बाजूचा मलबा हटविण्यासाठी जेसीबी, पोकलेन आणि डंपरचा वापर केला जात आहे. इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या जीविताची दक्षता घेऊन काळजीपूर्वक ही मोहीम हाताळली जात आहे.

घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विजयकुमार चौबे आणि एनडीआरएफचे कमांडंट प्रवीण धट्ट यांनी आतापर्यंत झालेल्या कामाची माहिती घेऊन पुढील बचावकार्याच्या रणनीतीवर चर्चा केली. अडकलेल्या नागरिकांना सुखरूपपणे कसे बाहेर काढता येईल याबद्दल प्रत्यक्ष जागेवरील परिस्थिती आणि इमारतीची सद्यस्थिती याचा सर्व बाजूने विचार करून रणनीती ठरवण्यात आली आहे.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. बचावकार्यासाठी आवश्यक सर्व साधनसामग्री आणि मशिनरी उपलब्ध ठेऊन मशिनरी कार्यरत आहेत. घटना घडून जवळपास ४५ तासांपेक्षा अधिक कालखंड झाला आहे. त्यामुळे जलद गतीने मोहीम राबवून इमारतीत अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांना तसे निर्देश दिले आहेत, असे आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले आहेत.

इमारतीच्या समोरील बाजूने प्रवेश करण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून मागील बाजूने इमारतीत प्रवेश करण्यासाठी त्या ठिकाणचा मलबा हटवून सुरक्षित मार्ग तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. या इमारतीत अडकलेल्या ज्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे त्यांच्याकडून माहिती घेऊन आत अडकलेले नागरिक नेमके कोणत्या जागी अडकले आहेत त्या जागेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मार्ग तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार बचावकार्याला गती देण्यात आली आहे, अशी माहिती एनडीआरएफचे कमांडंट प्रवीण धट्ट यांनी दिली आहे.

माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांची घटनास्थळाला भेट

यादरम्यान, आज माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनीही दुर्घटनास्थळी भेट देऊन बचाव मोहिमेचा आढावा घेतला. त्यांनी महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून दुर्घटना आणि सुरू असलेल्या बचावकार्याची सविस्तर माहिती घेतली. आत अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवा असे ते म्हणाले. तसेच इमारतीत अडकलेल्या नातेवाईकांशी घटनास्थळी भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे तसेच महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे यांनी घटनास्थळी पाहणी करून साधला इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संवाद

आज महापौर रवि लांडगे यांनी दुर्घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी त्यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला. सध्या सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती देत, सर्व यंत्रणा समन्वयाने आणि अत्यंत दक्षतेने कार्यरत असून अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत सुरक्षितरीत्या पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नातेवाईकांना सांगितले.

Post Views: 16
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’
Next Article भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील भगदाडामुळे जीवितास धोका; तातडीने दुरुस्ती व दोषींवर गुन्हा दाखल करण्याची सचिन काळभोर यांची मागणी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अहिल्यानगर

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

अहिल्यानगर, रुई, (राहता) प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त रुई, ता. राहाता,…

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?