Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

October 2, 2026

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’
पिंपरी चिंचवड

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांची रुग्णालयात भेट; ‘महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध’

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मेडिकव्हर व साईनाथ रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस; अधिकाऱ्यांना तातडीच्या उपचारांसह सर्व प्रशासकीय मदतीच्या सूचना

पिंपरी, दि. १० जुलै २०२६ : मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प परिसरात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील जखमी नागरिकांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी शुक्रवारी मेडिकव्हर हॉस्पिटल आणि साईनाथ हॉस्पिटल येथे जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी जखमी व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत मानसिक धीर दिला आणि महानगरपालिका त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याची ग्वाही दिली.

भेटीदरम्यान साईनाथ हॉस्पिटलचे प्रमुख तथा नगरसदस्य डॉ. सुहास कांबळे, महापालिकेतील संबंधित अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रत्येक जखमीच्या प्रकृतीची सविस्तर माहिती महापौरांनी घेतली. जखमींना सर्वोत्तम आणि तातडीचे उपचार मिळावेत, उपचारात कोणतीही त्रुटी राहू नये तसेच आवश्यक असलेला सर्व शासकीय समन्वय तातडीने पूर्ण करावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

याशिवाय, प्रत्येक बाधित कुटुंबाला आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देशही महापौरांनी प्रशासनाला दिले.

यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, “ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी असून प्रत्येक बाधित कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. नागरिकांचे प्राण आणि सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च जबाबदारी आहे. जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत, त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही अडचण येऊ नये आणि आवश्यक त्या प्रत्येक स्तरावर महानगरपालिका त्यांच्या सोबत राहील. या संकटाच्या काळात संपूर्ण प्रशासन प्रत्येक बाधित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”

दुर्घटनेतील सर्व जखमी नागरिकांनी लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावे आणि त्यांच्या कुटुंबियांना या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थनाही महापौरांनी व्यक्त केली.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून बचावकार्य, वैद्यकीय उपचार, समन्वय आणि आवश्यक प्रशासकीय मदत प्राधान्याने सुरू असून, बाधित नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमोशी दुर्घटनास्थळी उपमहापौर शर्मिला बाबरांची पाहणी; बाधित कुटुंबीयांना दिला धीर
Next Article मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

२.७७ कोटींच्या एक्स-रे मशीन खरेदीवरून महापालिकेत खळबळ!

September 30, 2026

शेतीपंपांच्या डीपीमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद

September 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अहिल्यानगर

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

अहिल्यानगर, रुई, (राहता) प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त रुई, ता. राहाता,…

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?