Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

आरक्षण उपवर्गीकरणाला परिषदेचा विरोध; समाजात फूट पडू देणार नाही – ॲड. जयदेव गायकवाड

June 29, 2026

राज्यातील बेकायदेशीर वृक्षतोडीचा मुद्दा विधान परिषदेत; आमदार अमित गोरखे यांच्या तारांकित प्रश्नावर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

June 29, 2026

सरकार सेतू पुलावरील २२ कोटींच्या कामाची चौकशी करण्याची भोईर यांची मागणी

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»‘संघर्ष’ हाच भाजपचा डीएनए; आमदार श्रीकांत भारतीय यांनी उलगडला आणीबाणीचा इतिहास
पिंपरी चिंचवड

‘संघर्ष’ हाच भाजपचा डीएनए; आमदार श्रीकांत भारतीय यांनी उलगडला आणीबाणीचा इतिहास

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

निगडीत ‘लोकशाही रक्षक पुरस्कार’ सोहळा; आणीबाणीतील सत्याग्रहींचा सन्मान

पिंपरी, दि.२९ : २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या स्मृतिदिनानिमित्त निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘लोकशाही रक्षक पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आणीबाणीच्या काळात सत्याग्रह करणाऱ्या आणि मिसा (MISA) कायद्यांतर्गत तुरुंगवास भोगलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी आमदार श्रीकांत भारतीय यांनी आणीबाणीच्या काळातील संघर्षाचा इतिहास उलगडत कार्यकर्त्यांना लोकशाही रक्षणासाठी सदैव सज्ज राहण्याचे आवाहन केले. “भारतीय जनता पक्षाचा उदय हा आणीबाणीच्या काळातील संघर्षातून झाला असून ‘संघर्ष’ हाच आमच्या पक्षाचा डीएनए आहे. इतिहास केवळ वाचण्याचा नसून तो हृदयाने समजून घेण्याचा असतो,” असे ते म्हणाले. लोकशाहीसाठी बलिदान देणाऱ्यांचे स्मरण ठेवत संघटनात्मक समन्वय वाढविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी आणीबाणीचा उल्लेख भारतीय लोकशाहीवरील सर्वात काळा अध्याय म्हणून केला. त्या काळात नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेण्यात आले, अनेक राष्ट्रभक्तांनी तुरुंगवास आणि अमानुष छळ सहन केला, मात्र हुकूमशाहीपुढे झुकले नाहीत. त्यांच्या त्यागामुळेच आज देशात लोकशाही बळकट असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात आमदार श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते ज्येष्ठ सत्याग्रहींना ‘लोकशाही रक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या प्रसंगी अनेकांच्या भावना अनावर झाल्या.

या कार्यक्रमास आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, आमदार शंकर जगताप, माजी आमदार अश्विनीताई जगताप, संगठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, अभिषेक बारणे, सदाशिव खाडे, मधू जोशी, आबा खांबे, डॉ. बाळकृष्ण नाईक, दिनेश यादव, सुजाता पालांडे, डॉ. गीता आफळे यांच्यासह विविध आघाड्या व मोर्चांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, शक्तिकेंद्र व बूथ प्रमुख तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शत्रुघ्न काटे यांनी केले. सूत्रसंचालन देवदत्त भिंगारकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संयोजक मोरेश्वर शेडगे यांनी मानले.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवडकरांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरक्षित व सुव्यवस्थित राखण्याचे विनम्र आवाहन… श्री.पवन शर्मा
Next Article ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ ५० लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

आरक्षण उपवर्गीकरणाला परिषदेचा विरोध; समाजात फूट पडू देणार नाही – ॲड. जयदेव गायकवाड

June 29, 2026

सरकार सेतू पुलावरील २२ कोटींच्या कामाची चौकशी करण्याची भोईर यांची मागणी

June 29, 2026

गुणवंत विद्यार्थ्यांचा ज्येष्ठ नागरिक संघाकडून गौरव; विकासनगर-किवळे येथे सत्कार सोहळा उत्साहात

June 29, 2026

११२३ केंद्रांवर २.२७ लाखांहून अधिक बालकांना पोलिओचे दोन थेंब

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

आरक्षण उपवर्गीकरणाला परिषदेचा विरोध; समाजात फूट पडू देणार नाही – ॲड. जयदेव गायकवाड

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

पिंपरी, दि. २९ जून २०२६ : मागासवर्गीय आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न…

राज्यातील बेकायदेशीर वृक्षतोडीचा मुद्दा विधान परिषदेत; आमदार अमित गोरखे यांच्या तारांकित प्रश्नावर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

June 29, 2026

सरकार सेतू पुलावरील २२ कोटींच्या कामाची चौकशी करण्याची भोईर यांची मागणी

June 29, 2026

३० जूनपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवा; १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?