Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे ग्रामीण»समर्थ गुरुकुलमध्ये सीबीएसई दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात
पुणे ग्रामीण

समर्थ गुरुकुलमध्ये सीबीएसई दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

“जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास, सातत्यपूर्ण परिश्रम आणि शिस्त यांच्या बळावरच यश संपादन करता येते.” – सौ. अन्नपूर्णा राव

पुणे (बेल्हे)प्रतिनिधी,संदीप शितोळे : समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल येथे सीबीएसई दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव करण्यासाठी आयोजित या सोहळ्याला विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून समर्थ गुरुकुलच्या माजी प्राचार्या सौ. अन्नपूर्णा राव उपस्थित होत्या. यावेळी कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहलताई शेळके, समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर, समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे, क्रीडा संचालक हरिश्चंद्र नरसुडे तसेच सखाराम मातेले यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना सौ. अन्नपूर्णा राव म्हणाल्या, “जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास, सातत्यपूर्ण परिश्रम आणि शिस्त यांच्या बळावरच यश संपादन करता येते.” विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून आत्मविश्वास, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर यश मिळवावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पालकांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करून त्यांच्या क्षमतांना योग्य दिशा देण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाला पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. अनेक विद्यार्थी व पालकांनी समर्थ गुरुकुलच्या दर्जेदार शिक्षणपद्धती, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, संस्कारक्षम वातावरण आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद, पालकांच्या डोळ्यांतील समाधान आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरील अभिमान यामुळे संपूर्ण परिसर प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समृद्ध परंपरा समर्थ गुरुकुलने पुन्हा एकदा अधोरेखित केली.

कार्यक्रमाचे नियोजन प्रिया कडूसकर, सुकन्या हिंगे, वैशाली सहाणे आणि स्नेहल ढोले यांनी केले. सूत्रसंचालन रामचंद्र मते यांनी केले, तर दीपाली नवले यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपालघर जिल्ह्याच्या विकासाला वेग- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Next Article प्रामाणिक पोलिसांच्या पाठीशी समाजाने उभे रहावे – बाळासाहेब बोराटे
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

June 29, 2026

प्रामाणिक पोलिसांच्या पाठीशी समाजाने उभे रहावे – बाळासाहेब बोराटे

June 28, 2026

बिडीच्या थोटक्यांपासून पोलिसांचा आरोपींपर्यंत मागोवा; मध्य प्रदेशातील ५ केबल चोर अटकेत

June 27, 2026

सासवड पोलिसांचा प्रतिबंधित गुटख्यावर मोठा घाव; ₹२९.७० लाखांचा साठा जप्त

June 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?