Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»अप्पू घराचा चेहरामोहरा बदलणार; आधुनिक सुविधांसह पर्यटकांचे होणार स्वागत – स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे
पिंपरी चिंचवड

अप्पू घराचा चेहरामोहरा बदलणार; आधुनिक सुविधांसह पर्यटकांचे होणार स्वागत – स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड….. शहरातील अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या ‘अप्पू घरा’चा लवकरच कायापालट करण्यावर आमचा भर असणार आहे. काळाची गरज ओळखून या ठिकाणी आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. अप्पू घराच्या आधुनिकीकरणाचा मानस स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी व्यक्त केला आहे.

या संदर्भात माहिती देताना सभापती अभिषेक बारणे म्हणाले की, “अप्पू घर हे सर्वसामान्यांसाठी पर्यटनाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. सध्याच्या महागड्या अम्युझमेंट पार्क्सच्या तुलनेत अप्पू घराचे तिकीट दर अत्यंत कमी आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी विशेष बदल झाले नव्हते. आता तेथील राईड्स आणि सुखसोयींचे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे.”

आधुनिकीकरण करताना सर्वसामान्यांचा विचार

अप्पू घराच्या विकासकामांबाबत बोलताना बारणे यांनी स्पष्ट केले की, जरी सुविधा आधुनिक केल्या तरी त्याचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील, अशाच प्रकारे ठेवले जातील. कामगारांच्या शहरात सामान्य नागरिकांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, यासाठी हे दर मर्यादित ठेवण्यावर महापालिकेचा भर असेल.

अप्पू घरासाठी २०३१ पर्यंत संबंधित कंत्राटदारावर करार करण्यात आला आहे. यामध्ये वॉटर पार्क आणि इतर नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे. सध्याच्या कामांचा आढावा घेताना बारणे म्हणाले की, “या प्रकल्पासाठी उपलब्ध असलेल्या निधीतून ऑक्टोबरपर्यंतची कामे वेगाने पूर्ण केली जातील. कामाचा दर्जा उत्तम असावा आणि पर्यटकांना एक दर्जेदार अनुभव मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”

अप्पू घराला पुनर्जीवित करून त्याला पुन्हा एकदा शहराचे ‘दिमाखदार’ आकर्षण म्हणून विकसित करण्याचा संकल्प सभापतींनी यावेळी व्यक्त केला.

Post Views: 14
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न
Next Article हिंजवडीत ब्राऊन शुगरचा मोठा साठा जप्त; १२.६६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एकाला अटक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?