Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»भोसरीत बीएलओंना विशेष प्रशिक्षण ;३० जूनपासून घरभेटींद्वारे मतदार पडताळणी
पिंपरी चिंचवड

भोसरीत बीएलओंना विशेष प्रशिक्षण ;३० जूनपासून घरभेटींद्वारे मतदार पडताळणी

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 25, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी, दि. २५ जून २०२६ : २०७ भोसरी विधानसभा मतदारसंघातील विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या तयारीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि नवनियुक्त सहाय्यक मतदान नोंदणी अधिकाऱ्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आले. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीरहित करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षणात भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या कालबद्ध कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. प्रगणना पत्रक भरण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी तसेच घरभेटीदरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

भोसरी विधानसभा मतदारसंघात सध्या ६ लाख ३६ हजार ४२४ मतदार असून मतदार यादीतील मॅपिंगचे प्रमाण ५८.६६ टक्के आहे. मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी ४८३ बीएलओ आणि ४८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

३० जून ते २९ जुलै या कालावधीत बीएलओ घरभेटी देऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत. या वेळी प्रगणना पत्रके भरून घेण्यात येणार असून मतदार यादीतील नोंदी अद्ययावत करण्यासाठी आवश्यक माहिती संकलित केली जाणार आहे.

मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन पाटील यांनी सांगितले की, मतदार यादी अद्ययावत आणि त्रुटीरहित ठेवण्यासाठी घरभेटींच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार आहे. नागरिकांनी प्रगणना पत्रकातील माहिती काळजीपूर्वक तपासून आवश्यक कागदपत्रांसह बीएलओंना सहकार्य करावे.

प्रगणना पत्रकात अद्ययावत मोबाईल क्रमांक नमूद करावा. कुटुंबातील सदस्यांचे मॅपिंग चुकीचे असल्यास अथवा इतर विसंगती आढळल्यास ती बीएलओंच्या निदर्शनास आणून द्यावी. आवश्यक तेथे संबंधित कागदपत्रे सादर करून विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार तथा तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी सतीश थेटे यांनी केले .

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सहाय्यक आयुक्त तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी अजिंक्य येळे, परशुराम वाघमोडे, नायब तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी विकी परदेशी हे देखील उपस्थित होते.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराष्ट्रीय स्पर्धेत अविष्कार दुर्गाडे प्रथम; ५१ हजारांची बक्षीस रक्कम कानिफनाथ चरणी अर्पण
Next Article विषारी दारू प्रकरणातील दोषींवर मोक्का; मृतांच्या सर्व २२ कुटुंबांना प्रत्येकी ५ लाखांची मदत
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

पिंपळे गुरवमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून खून; महिलेस अटक

June 29, 2026

शांता शेळके सभागृहासाठी स्वतंत्र लिफ्ट बसविण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?