Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»शाळा व महाविद्यालय परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेची कारवाई
पिंपरी चिंचवड

शाळा व महाविद्यालय परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेची कारवाई

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 23, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शैक्षणिक वातावरण अबाधित ठेवण्यासाठी विशेष मोहीम

पिंपरी, दि. २३ जून २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातील अनधिकृत टपऱ्या, पानटपऱ्या आणि तत्सम अतिक्रमणांवर विशेष कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच शैक्षणिक संस्थांच्या परिसरात स्वच्छ, सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान मोरवाडी, आकुर्डी, चिंचवड, जाधववाडी, भोसरी, इंद्रायणीनगर, खराळवाडी, लांडेवाडी, दापोडी, जुनी सांगवी, थेरगाव आदी परिसरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या आजूबाजूला उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्यांची पाहणी करण्यात आली. कारवाईदरम्यान एकूण ३५ अनधिकृत टपऱ्या हटविण्यात आल्या, तर अनेक टपरीधारकांनी कारवाईची सूचना मिळताच स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली. त्यामुळे परिसरातील अनधिकृत व्यावसायिक उपक्रमांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात यश आले.

सदर कारवाई ही केवळ अतिक्रमण निर्मूलनापुरती मर्यादित नसून सार्वजनिक आरोग्य आणि तंबाखूमुक्त वातावरण निर्मितीच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाने शासकीय, निमशासकीय तसेच सार्वजनिक ठिकाणे तंबाखूमुक्त ठेवण्याबाबत वेळोवेळी निर्देश जारी केले आहेत. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शाळा व महाविद्यालय परिसरातील अतिक्रमणे, अनधिकृत व्यावसायिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा पोहोचविणाऱ्या बाबींवर नियमितपणे लक्ष ठेवण्यात येत असून अशा कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहेत.

“विद्यार्थ्यांचे सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण राखणे ही महापालिकेची प्राथमिकता आहे. शाळा व महाविद्यालय परिसरातील अनधिकृत टपऱ्या आणि अतिक्रमणे हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून अशा कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहतील. विद्यार्थ्यांच्या हिताशी तडजोड होणार नाही यासाठी सर्व संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.”

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदेहू-आळंदी पालखी मार्गाला ‘संतभूमी’ घोषित करण्याची मागणी
Next Article इंडो अथलेटिक्स सोसायटीची १० वी पुणे–पंढरपूर सायकल वारी उत्साहात संपन्न
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?