Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»चिखलीत कोयता गँगचा थरार; तरुणावर जीवघेणा हल्ला, हवेत कोयते फिरवत दहशत
पिंपरी चिंचवड

चिखलीत कोयता गँगचा थरार; तरुणावर जीवघेणा हल्ला, हवेत कोयते फिरवत दहशत

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 22, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पूर्वीच्या भांडणाचा राग; डोक्यावर-हातावर वार करून गंभीर जखमी, चार जणांविरोधात गुन्हा

पिंपरी-चिंचवड, दि. २३ जून २०२६ – चिखली परिसरात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत समोर आली असून, पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून चार जणांनी एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, आरोपींनी हल्ल्यानंतर परिसरात हवेत कोयते उगारून नागरिकांना धमकावत दहशत माजवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी अटकेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २१ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास नरसिंह ऑटो गॅरेज, भाजी मंडई रोड आणि जय अंधे इलेक्ट्रिकल्स, साने चौक, चिखली येथे घडली. याप्रकरणी विनायक ऊर्फ बाबू राजू ननावरे (वय २४, रा. सुदर्शन नगर, रस्ता क्र. २, रत्नछाया बिल्डिंग, साने चौक, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीवरून पोलिसांनी सिद्धार्थ घाईजे (वय २१, पत्राशेड, अजंठनगर, निगडी), शिवशंकर श्रीमंगल (वय २०, मेदनवाडी, चाकण) आणि त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपींनी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून विनायक ननावरे यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यावर आणि हातावर वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. तसेच फिर्यादीचा मित्र कार्तिक कसाळकर यालाही मारहाण करण्यात आली. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून निघताना हवेत कोयते उगारून “समोर आला तर एकेकाला बघून घेऊ” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१९/२०२६ दाखल करण्यात आला असून आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११५(२), ३(५), शस्त्र अधिनियम कलम ४, २५, २७ तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३, ७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post Views: 27
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअतिक्रमण निर्मूलन मोहिमेला गती; अडीच महिन्यांत ८२० ठिकाणी कारवाई
Next Article लिंक्डइनवरून नोकरीचे आमिष; सांगवीत १.७२ लाखांची ऑनलाइन फसवणूक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?