Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

August 13, 2026

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»भारतातील पहिले आदिवासी कला-कौशल्य-कारागिरीचे केंद्र पिंपरी-चिंचवडमध्ये! 
पिंपरी चिंचवड

भारतातील पहिले आदिवासी कला-कौशल्य-कारागिरीचे केंद्र पिंपरी-चिंचवडमध्ये! 

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 22, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन;आमदार महेश लांडगे यांच्या ७ विविध मागण्यांना ‘‘ग्रीन सिग्नल’’

मुंबई | प्रतिनिधी…..भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिवीर चापेकर बंधूंची भूमि पिंपरी-चिंचवडमध्ये आदिवासी व वंचित घटकांतील मुलांसाठी समर्पित कला-कौशल्य-कारागिरीचे केंद्र उभारण्याचा संकल्प आता दृष्टीक्षेपात आला आहे. शहराचे भूषण आणि पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या संकल्पनेतील या केंद्राला जागा उपलब्ध करुन देण्याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात येणार आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघासह पिंपरी-चिंचवड शहरातील महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शहराच्या विकासाशी निगडित ७ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

या बैठकीला पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महेश लांडगे यांनी मांडलेल्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून, अनेक विषयांवर तातडीने कार्यवाहीचे आदेश देण्यात आले.

भारतातील आदिवासी कला-कौशल्य लूप्त होत आहेत. इंग्रजी शाळांचा प्रभाव वाढलेला असताना, भारतीय संस्कृती, सभ्यता यांचा पुरस्कार आणि प्रचार करणारे केंद्र उभारले जावे. त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात १५ हेक्टर जागा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीने केली होती. यावर पहिल्या टप्प्यात या प्रकल्पासाठी १० हेक्टर जागा आणि दुसऱ्या टप्प्यात ५ हेक्टर जागा उपलब्ध करण्याचे विचाराधीन आहे. यामध्ये संकूलाचे बांधकाम आणि ओपन स्पेस असा भव्य प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

तसेच, या बैठकीत मोशी येथे उभारण्यात येणाऱ्या आयआयएम नागपूरच्या उपशाखेसाठी जागा हस्तांतरणाचा विषय मार्गी लागला. याबाबतचा आदेश सात दिवसांत पारित करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी शैक्षणिक प्रकल्पाला गती मिळणार आहे. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीस आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी पुनर्प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून राज्य शासनाकडून त्यास मंजुरी देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. तसेच प्राधिकरण क्षेत्रातील मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा दीर्घकालीन प्रश्न सोडवण्यासाठी जमाबंदी आयुक्त आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने समन्वय साधून सहा महिन्यांत कालबद्ध कार्यक्रम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालयाला स्वतंत्र इमारत

भोसरी विधानसभा मतदारसंघातील तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयांसाठी कायमस्वरूपी इमारती उभारण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर महसूल सेवांमध्ये होणारा विलंब दूर करण्यासाठी अपर तहसीलदार कार्यालयातील पदभरती आणि पदवाढीसही तत्त्वतः मान्यता देण्यात आली. बोपखेल, डुडूळगाव, चऱ्होली बुद्रुक आणि चौविसावाडी ही गावे नगर भूमापन अधिकारी, पिंपरी-चिंचवड यांच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रस्ताव प्राप्त होताच मंजुरी देण्याचे आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले. त्यामुळे नागरिकांना महसूल कामांसाठी पुणे कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही.

अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी हक्काची जागा

याशिवाय, अपर तहसीलदार पिंपरी-चिंचवड कार्यालयासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांनी १५ दिवसांत पर्यायी जागेचा शोध घेऊन प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले. या सर्व विषयांचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडकरांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. “पिंपरी-चिंचवडच्या विकासाशी संबंधित प्रत्येक प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्याचे काम केले आहे. शहराच्या शाश्वत विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक असलेले सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील,” असे आमदार महेश लांडगे यांनी यावेळी सांगितले.

“क्रांतिवीर चापेकर बंधू हे पिंपरी-चिंचवडसह भारताचे भूषण आहे. या राष्ट्रप्रेमी विचारांचे स्मरण होईल आणि भारतातील पहिले आदिवासी कला-कौशल्य-कारागिरीचे केंद्र माझ्या पिंपरी-चिंचवडमध्ये होणार आहे, याचा विशेष अभिमान वाटतो. यासह भोसरी विधानसभा मतदारसंघ आणि शहराच्या विकासाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक निर्णय घेतले आहेत. आयआयएम मोशी प्रकल्प, प्राधिकरण मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड, नगर भूमापन कार्यक्षेत्र विस्तार, महसूल कार्यालयांची उभारणीचा विषय आता मार्गी लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी आमचा पाठपुरावा यापुढेही अधिक ताकदीने सुरू राहील.”

— महेशदादा लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Post Views: 12
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशालेय स्तरापासून योगाचे धडे देणे काळाची गरज – आमदार शंकर जगताप
Next Article पिंपरी-चिंचवड “आयआयएम” शाखा उभारणीला “बुस्टर” 
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

विलगीकरणातून कचरा प्रक्रिया आणि पुनर्वापराला मिळणार गती

August 11, 2026

‘पार्किंग पॉलिसी’ आणि हॉकर्स धोरणा’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी झोनची पाहणी सुरू

August 11, 2026

चिखलीत ७-८ भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर जीवघेणा हल्ला; दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी

August 10, 2026

हुतात्म्यांच्या बलिदानातून भावी पिढ्यांनी राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घ्यावी

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
छत्रपती संभाजी नगर

जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारा अवलिया; शाहीर विजय मोकळे करंजगावकर

By Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 13, 20260

वैजापूर प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने धडपडणारे, लेखणी, वाणी आणि…

नाशिक फाटा–राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला पंधरा दिवसांत मुहूर्त

August 13, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचा टिळेकर परिवारातर्फे सन्मान

August 13, 2026

शिरवळमध्ये पहाटेचा काळीज पिळवटून टाकणारा अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?