Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्ती कार्यअहवालाचे अनावरण;कसबा गणपती मंदिरात उत्साहात सोहळा संपन्न 
पुणे

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्ती कार्यअहवालाचे अनावरण;कसबा गणपती मंदिरात उत्साहात सोहळा संपन्न 

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे, : “जय गणेश!”च्या मंगलमय घोषात रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या कार्यअहवालाचे अनावरण आज पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर येथे दिमाखदार वातावरणात पार पडले. कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते या विशेष कार्यअहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

२० जून २०१७ ते २० जून २०२६ असा दहा वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करणाऱ्या रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टने या दशकभरात सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. ही केवळ एका ढोल-ताशा पथकाची दशकपूर्ती नसून प्रामाणिकपणा, कष्ट, जिद्द, एकजूट आणि गणरायाच्या कृपाशीर्वादाची यशोगाथा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमास आमदार हेमंत रासने यांच्यासह उत्तर मंडल अध्यक्ष अमित कंक, मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाच्या सचिव सौ. दीपा प्रशांत तावरे, श्री कसबा गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विनायक ठकार, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित, विश्वस्त साई डोंगरे, विद्यमान नगरसेवक देवेंद्र (छोटू) वडके, शिवसाम्राज्य पथकाचे अध्यक्ष अक्षय बलकवडे, युवा वाद्यपथकाचे सर्वेसर्वा अॅड. अनिश पाडेकर, गणेश देशपांडे, श्रीराम पथकाचे अध्यक्ष विलास शिगवण, अतुल्य वाद्यपथकाचे अध्यक्ष अॅड. विपुल पांचाळ, उपाध्यक्ष सहेश आगरकर, कसब्याचा राजा जनार्दन पवळे संघाचे उत्सव प्रमुख राकेश डाखवे तसेच सामाजिक कार्यकर्ते पृथ्वी पंडित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दशकपूर्ती निमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या कार्यअहवालामध्ये ट्रस्टच्या गेल्या दहा वर्षांतील विविध उपक्रम, सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक जपणूक आणि भविष्यातील वाटचालीचा आढावा सादर करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी रुद्रांग वाद्यपथकाच्या कार्याचे कौतुक करत आगामी काळासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला पथकाचे पदाधिकारी, सदस्य, माजी सदस्य आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्याने रुद्रांग वाद्यपथकाच्या यशस्वी दशकपूर्तीला संस्मरणीय स्वरूप प्राप्त झाले.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article“निरोगी आरोग्य व वृद्धत्वासाठी योग” या संकल्पनेवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
Next Article पिंपळे सौदागरमध्ये भजनाच्या ठेक्यावर रंगली योगसाधना
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवडकरांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरक्षित व सुव्यवस्थित राखण्याचे विनम्र आवाहन… श्री.पवन शर्मा

June 29, 2026

फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने उद्योजकाची ८८.१९ लाखांची ऑनलाइन फसवणूक; बावधन पोलिसांत गुन्हा दाखल

June 27, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आळंदीत अत्याधुनिक PET-CT युनिटचे लोकार्पण

June 27, 2026

हिंजवडीत ब्राऊन शुगरचा मोठा साठा जप्त; १२.६६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एकाला अटक

June 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?