Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

June 29, 2026

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»पीएमपीएमएल (PMPML) च्या ९,००० कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ₹२५,००० दिवाळी सानुग्रह अनुदान मंजूर
पुणे

पीएमपीएमएल (PMPML) च्या ९,००० कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ₹२५,००० दिवाळी सानुग्रह अनुदान मंजूर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJune 3, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आमदार अमित गोरखे यांच्या प्रयत्नांना अखेर मोठे यश; प्रशासनाकडून रु.२० कोटींचा निधी जारी

पुणे,०३ जून २०२६ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपीएमएल (PMPML) मधील हजारो कष्टकरी कामगारांचा अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला दिवाळी सानुग्रह अनुदानाचा (बोनस) प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार श्री. अमित गोरखे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि सकारात्मक पाठपुराव्यामुळे प्रशासनाने अखेर २० कोटींचा निधी मंजूर केला असून, प्रत्येक पात्र कामगाराच्या खात्यात २५ हजार रूपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सुमारे ९ हजार कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

दिवाळी उलटून गेल्याने कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण

पीएमपीएमएल मधील कामगारांना दरवर्षी ८.३३ टक्के बोनस तसेच महापालिकेच्या धर्तीवर सानुग्रह अनुदान देण्यात येते. मात्र, सन २०२५-२६ या वर्षातील सानुग्रह अनुदानाची रक्कम प्रलंबित राहिल्याने कामगारांमध्ये असंतोष व चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. दिवाळी सण उलटून अनेक महिने झाले तरी हक्काचे अनुदान न मिळाल्याने कामगार कुटुंबे अडचणीत आली होती. या पार्श्वभूमीवर, विविध कामगार संघटना आणि प्रतिनिधींनी आमदार अमित गोरखे यांची भेट घेऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची विनंती केली होती.

आमदार अमित गोरखे यांचा संवेदनशील पाठपुरावा

कामगारांची हीच व्यथा आणि न्याय्य मागणी लक्षात घेऊन आमदार अमित गोरखे यांनी तातडीने पीएमपीएमएल प्रशासन आणि संचालक मंडळाला पत्र दिले. केवळ पत्रव्यवहार न करता त्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने वैयक्तिक पाठपुरावा केला आणि कामगारांची बाजू प्रभावीपणे मांडली. त्यांच्या या संवेदनशील आणि प्राधान्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले असून प्रशासनाने ₹२० कोटींचा निधी वर्ग केला आहे.

कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी  

कष्टकरी कामगार बांधवांच्या हक्काचा पैसा त्यांच्या खात्यात जमा होत असल्याचा मला मनस्वी आनंद आहे. कामगारांचे प्रश्न आमच्यासाठी नेहमीच प्राधान्याचे राहिले आहेत. या संवेदनशील निर्णयाबद्दल मी पीएमपीएमएलचे संचालक मंडळ, प्रशासन आणि सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार मानतो. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आमचे सरकार आणि आम्ही सदैव कटिबद्ध आहोत व यापुढेही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे प्रतिपादन आमदार अमित गोरखे यांनी केले आहे.

कामगार वर्गात आनंदाचे वातावरण

आमदार अमित गोरखे यांच्या या यशस्वी मध्यस्थीमुळे कामगार वर्गातून अत्यंत सकारात्मक भावना व्यक्त होत आहेत. हक्काचे अनुदान थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्यामुळे हजारो कामगारांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, कामगार संघटनांनी आमदार गोरखे यांचे विशेष आभार मानले आहेत.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभरधाव दुचाकी भिंतीवर आदळली;चालकाचा मृत्यू
Next Article आकुर्डीतील हॉटेल मॅजेस्टिक परिसरातील १२ हजार चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाई
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरी-चिंचवडकरांना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरक्षित व सुव्यवस्थित राखण्याचे विनम्र आवाहन… श्री.पवन शर्मा

June 29, 2026

फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने उद्योजकाची ८८.१९ लाखांची ऑनलाइन फसवणूक; बावधन पोलिसांत गुन्हा दाखल

June 27, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आळंदीत अत्याधुनिक PET-CT युनिटचे लोकार्पण

June 27, 2026

हिंजवडीत ब्राऊन शुगरचा मोठा साठा जप्त; १२.६६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एकाला अटक

June 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
हवामान

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ३ ते ७ जुलैदरम्यान अतिवृष्टीची शक्यता

By Prabhakarnewsdigital@gmail.comJune 29, 20260

जून महिना संपत आला तरी राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली…

शहरात अवैध शस्त्र आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई; तीन गुन्हे दाखल, तिघांना अटक

June 29, 2026

डिलिव्हरी फ्रँचायझीच्या आमिषाने ५.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

June 29, 2026

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या; पतीवर गुन्हा दाखल

June 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?