बेल्हे प्रतिनिधी…..समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), बेल्हे येथील विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड होत असून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. नुकतेच तईकिशा इंजिनियरिंग इंडिया प्रा. लि. (बहुराष्ट्रीय कंपनी), कोंढापुरी, रांजणगाव, पुणे येथे कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कंपनीचे प्रतिनिधी डेप्युटी मॅनेजर (एचआर व अॅडमिन) रविंद्र करवंदे, प्रॉडक्शन इंजिनियर अमर गोडसे तसेच वेल्डिंग समन्वयक उमाकांत मालपे उपस्थित होते.
या कॅम्पस मुलाखतीत विविध ट्रेडमधील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये वेल्डर ट्रेडमधून प्रतीक बढे, रोहन रोकडे, सोहम भोर व इम्रान इनामदार यांची निवड झाली. फिटर ट्रेडमधून नाविन्य नरवडे व ऋषी कोरडे यांची निवड करण्यात आली. तसेच कोपा (कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट) ट्रेडमधून आनंद खुपटे यांची निवड झाली.
ड्राफ्ट्समन मेकॅनिकल ट्रेडमधून साक्षी काटे, किरण जाधव व दिपक गागरे यांची निवड करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडमधून रुतिक डेरे तसेच इलेक्ट्रिशियन ट्रेडमधून आयुष जाधव यांची निवड झाली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, प्राचार्य पांडुरंग हाडवळे, उपप्राचार्य विष्णू मापारी, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर तसेच सर्व विभागांचे प्राचार्य व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विलास सोनवणे, विकास कणसे व निकेश औटी यांनी विशेष परिश्रम घेतले.
