पुणे : खडकी कॅन्टोन्मेंट येथील कर्मचारी प्रसाद गावंडे यांच्यावरील कारवाईची अमलबजावणी तात्काळ करण्यात यावी तसेच रेंजहिल्स परिसरातील अण्णाभाऊ साठे मार्केटमध्ये बेकायदेशीर ताबा घेऊन दुकान चालवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
“जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरूच राहणार,” असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
या आंदोलनात उदय धेंडे, सुजित म्हस्के, देवेंद्र वेणुगोपाल, रिकी परदेशी, राजेश मोरे, अभिजित गडांकुश, राहूल अवचिते, निखिल दुर्गा, कार्तिक पाळकर, शुभम धेंगळे आणि ऋषी डोरके सहभागी झाले आहेत.
