Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»नागपूर»पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वडाळा येथील जागेवर भव्य ‘सिद्धार्थ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ उभारण्याचा निर्णय; नवनियुक्त विश्वस्त अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने कामकाजाला सुरुवात
नागपूर

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वडाळा येथील जागेवर भव्य ‘सिद्धार्थ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ उभारण्याचा निर्णय; नवनियुक्त विश्वस्त अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने कामकाजाला सुरुवात

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नागपूर | प्रतिनिधी….पीपल्स एज्युकेशन सोसायटीची वार्षिक बैठक नागपूर येथे संपन्न झाली. या बैठकीस सोसायटीचे सर्व विश्वस्त उपस्थित होते. या बैठकीमध्ये मुंबईतील वडाळा येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या जागेवर भव्य ‘सिद्धार्थ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ उभारण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावित क्रीडा संकुलाचे प्रतिनिधिक सादरीकरणही यावेळी करण्यात आले.

महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष तथा पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे नवनियुक्त विश्वस्त मा. अण्णा बनसोडे यांनी विश्वस्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सोसायटीच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या दिशेने सुरुवात केली आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना देणे आणि विद्यार्थ्यांसह नवोदित खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

प्रस्तावित सिद्धार्थ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये भव्य क्रिकेट स्टेडियम, ५० पेक्षा अधिक खेळांसाठी आधुनिक क्रीडा सुविधा, ३,५०० प्रेक्षकांची आसनक्षमता असलेले सभागृह, तीन उपहारगृहे, क्रीडा साहित्याची दुकाने तसेच खेळाडूंच्या निवासासाठी २०० निवासांची व्यवस्था प्रस्तावित आहे.

या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणे, नवोदित खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे, खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे, हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना पुढे नेत पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही भरीव योगदान देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रस्तावित सिद्धार्थ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समुळे मुंबईतील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळण्यास मदत होईल, तसेच विद्यार्थ्यांना आणि उदयोन्मुख खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसंविधान चौकाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक’ नाव द्या; परिसर ‘संविधान सृष्टी’ म्हणून विकसित करा!
Next Article अहिर सुवर्णकार मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात!
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

भारतीय शिक्षण व्यवस्थेचा प्राचीन वारसा जपणे गरजेचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 24, 2026

झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही,तर मूलभूत सुविधाही पुरविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 30, 2026

मिहान इंडियाकडून विविध उपक्रमांसाठी १ कोटी ३५ लाख रुपयांची मदत

August 20, 2026

अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?