Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»नागपूर»अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर

अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अंबाझरी तलावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी;जलपर्णी निर्मूलन मोहिमेचे केले कौतुक

नागपूर, दि.२० ऑगस्ट: नागपूरचे वैभव म्हणून अंबाझरी तलावाकडे पाहिले जाते. पाण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा नागनदीवरील धरण किंवा साठवण तलाव म्हणून याकडे पाहिले जायचे. अनेक वर्ष या तलावाने पिण्याचे पाणी नागपूर शहराला दिले. मध्यंतरी जलपर्णीने हा तलाव व्यापला होता. मात्र, महानगरपालिकेने जलपर्णी नामशेष करण्यासाठी प्रयत्न केले व ते अत्यंत यशस्वी झाले आहेत. एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून हा तलाव विकसित करण्यासाठी राज्य शासन महानगरपालिकेला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नागपूरची ओळख असलेल्या ऐतिहासिक अंबाझरी तलावाचे सौंदर्य आणि पर्यावरणीय महत्व जपण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने राबविलेल्या जलपर्णी निर्मूलन मोहिमेची मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाहणी केली. तलाव जलपर्णीमुक्त करण्यासाठी मनपाने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत मुख्यमंत्र्यांनी नौकेतून अंबाझरी तलावाची पाहणी केली.

यावेळी महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, विविध समित्यांची सभापती, नगरसेवक नगरसेविका यांच्यासह मनपाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मनपातर्फे विशेष मोहीम….

गेल्या काही महिन्यांपासून अंबाझरी तलावात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या जलपर्णीच्या निर्मूलनासाठी मनपातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जलपर्णीमुळे तलावाचा मोठा परिसर व्यापला गेला होता. त्यामुळे तलावाचे नैसर्गिक सौंदर्य बाधित होण्यासोबतच जलतरणपटू आणि नौकायनाचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत होता. अंबाझरी तलावाला जलपर्णीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली. सर्वांच्या प्रयत्नातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.

जलपर्णी काढण्यासाठी जेसीबी आणि वीड हार्वेस्टरचा वापर करण्यात आला. या मोहिमेमुळे तलावातील जलपर्णी मोठ्या प्रमाणात हटविण्यात आली असून अंबाझरी तलावाचा परिसर अधिक स्वच्छ आणि खुला झाला आहे. तलावाच्या संवर्धनासाठी मनपाने केलेल्या या प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाणून घेतली आणि उपक्रमाचे कौतुक केले.

Post Views: 5
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचिखलीतील चिमुकलीवरील कुत्र्यांच्या हल्ल्याने संताप; मनपा प्रशासनाला जाब
Next Article मिहान इंडियाकडून विविध उपक्रमांसाठी १ कोटी ३५ लाख रुपयांची मदत
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही,तर मूलभूत सुविधाही पुरविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 30, 2026

मिहान इंडियाकडून विविध उपक्रमांसाठी १ कोटी ३५ लाख रुपयांची मदत

August 20, 2026

पैसे नाही म्हणून शस्त्रक्रिया थांबणार नाही -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?