Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»नागपूर»भारतीय शिक्षण व्यवस्थेचा प्राचीन वारसा जपणे गरजेचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर

भारतीय शिक्षण व्यवस्थेचा प्राचीन वारसा जपणे गरजेचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 24, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेचा नागपुरात समारोप

नागपूर दि २४ ऑक्टोबर : भारतातील प्राचीन शिक्षण व्यवस्था अतिशय महान असून येथे तक्षशिला, नालंदा,विक्रमशिलासारखी विद्यापीठे अस्तित्वात होती. जगाच्या कानकोपऱ्यातून विद्यार्थी येथे ज्ञानार्जनासाठी यायचे. हे प्राचीन ज्ञान एवढे वैशिष्ट्यपूर्ण होते, की तेव्हाही भारत जागतिक व्यापार, जीडीपी व निर्यातीतही वर्चस्व गाजवत होता. वर्तमानात दिशादर्शक ठरणाऱ्या प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्थेचा वारसा जपणे ही येणाऱ्या पिढीची मोठी जबाबदारी व काळाचीही गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ९ व्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेच्या समारोपीय समारंभात बोलत होते. मिहान येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट(आयआयएम) येथे आयोजित या कार्यक्रमास शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, माजी खासदार डॉ. नितीश भारद्वाज यांची विशेष उपस्थिती होती. आयआयएम नागपूरचे संचालक डॉ.भीमराया मेत्री, द साऊथ पब्लिक स्कूलच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी दस्तुरे, सनफ्लॉवर व तायची पब्लिशिंगचे व्यवस्थापकीय संचालक राजेश घई, नवनीत प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष (एज्युकेशनल बुक्स डिव्हिजन) देविश गाला, द साऊथ पब्लिक स्कूलचे संचालक दिवेन दस्तुरे, न्यू सरस्वती हाऊसचे नॅशनल सेल्स हेडचे प्रमुख विरल उपाध्याय, एड्युव्हेटचे प्रमुख नुपूर मराठे आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचे सहयोगी संचालक रविशंकर रथ आदी यावेळी उपस्थित होते.

प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीची महानता सांगताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आचार्य चाणक्य, पाणिनी या विद्वानांचे व त्यांच्या ग्रंथाचे महत्त्व सदोदित आहे. पूर्वी शिक्षणाची प्रणाली ‘शास्त्र’ व ‘संवाद’ रुपात होती. ज्ञान केवळ सैद्धांतिक नव्हते तर उपयोजित व कौशल्य-आधारित होते. त्यातूनच राष्ट्रीय, सामाजिक व वैयक्तिक विकास साधता येतो. ‘एआय’च्या युगात मानवी मूल्ये, नीतिमत्ता व चारित्र्य जपण्याची मोठी जबाबदारी नव्या पिढीवर असून आपल्या शिक्षण प्रणालीचा केंद्रबिंदू असलेल्या विद्यार्थ्यांभोवतीच्या अनेक चर्चा आपण ऐकतो. या परिषदेने ‘जनरेशन वॉव’ (वर्ल्ड ऑफ वंडरफुल जनरेशन) ही नवी संकल्पना मांडली असून ‘झेन झी’ किंवा ‘जेन अल्फा’पेक्षा ती निराळी आहे. ही पहिली पिढी आहे, जी माहितीच्या स्फोटासोबत जन्माला आली व तंत्रज्ञानाच्या स्फोटासोबत वाढत आहे.

‘मिलेनियल्स’ अशी पिढी आहे की ज्यांच्या आयुष्याचा नंतरचा भाग विकसित तंत्रज्ञानासोबत जात आहे. ‘जनरेशन वॉव’कडे प्रचंड प्रमाणात माहिती व अफाट उगमस्थाने आहे. त्याचे ज्ञानात रूपांतर करण्याची व त्याचा विचारपूर्वक वापर करण्याची दुहेरी जबाबदारी या पिढीवर आहे. ज्ञान हे त्या माहितीवर प्रक्रिया करण्याचे शहाणपण आहे. त्या माहितीला एक नैतिक स्वरूप देणे, योग्य-अयोग्य ओळखणे व संवेदनशीलतेने ते आचरणात आणणे हेच आज खरे आव्हान आहे, असे ही मुख्यमंत्री म्हणाले.

सध्याच्या माहितीच्या स्फोटाच्या काळात वावरणाऱ्या पिढीला उपलब्ध माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे शहाणपण अंगी बाणवता आले पाहिजे. सध्याच्या काळात शिक्षक – अध्यापकांची भूमिका ही विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यापेक्षा त्यांच्या विचार प्रक्रियेला योग्य तो आकार देण्याची असली पाहिजे. माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठी आवश्यक ती सखोल चर्चा व मंथन या परिषदेच्या माध्यमातून करण्यात येत असल्यामुळे ही परिषद महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, अनेक आक्रमणांमुळे आपल्या देशातील विद्यापीठे व व्यवस्था कोलमडली. विल्यम अ‍ॅडम यांच्या सर्वेक्षणानुसार बंगाल, बिहार, पंजाब राज्यांमध्ये लक्षावधी शाळा होत्या. मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये हजारो व्याकरणशाळा होत्या. आपल्यावर राज्य करणाऱ्यांच्या ह्या नोंदी आहेत. यावरून प्राचीन भारतातील शैक्षणिक समृद्धता लक्षात येते. परंतु ही शैक्षणिक पद्धती व प्रणाली दीर्घकाळ टिकू शकली नसली तरी येथील समाज सुधारकांनी घडवून आणलेल्या क्रांतीने येथे शिक्षणाची बीजे पुनःश्च रोवल्या गेली. त्यातून आपण विकास साधत आहोत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत या क्षेत्रात अनेक नवीन पद्धतींचा अवलंब करण्यात येत आहे. आपण आपले लक्ष आता नव्या पिढीवर केंद्रित केले पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर करणे आपल्याच हातात असून आपण या नव्या पिढीची नवी जडणघडण करायला हवी. मातृभाषेची कास आपण सोडता कामा नये कारण विकसित देशांची शिक्षण प्रणाली त्यांच्या मातृभाषेत आहे. नवीन शैक्षणिक धोरणात याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. तंत्रज्ञानाच्या आहारी जाण्यापेक्षा ते वापरण्याचे कौशल्य आपण आत्मसात केले तर सर्वांगीण विकास साधता येणे शक्य आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शालेय शिक्षण राज्यमंत्री श्री. भोयर म्हणाले, ‘वर्ल्ड ऑफ वंडरफुल जनरेशन’ या संकल्पनेवर आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेत शिक्षण क्षेत्रातील आव्हानांवर सखोल चर्चा पार पडल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश 2047 च्या ‘विकसित भारत’ या लक्ष्याकडे वाटचाल करतअसून, महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा, आणि ‘मुख्यमंत्री विज्ञान विद्यार्थी वारी’ यांसारखे उपक्रम राबवले जात आहे. या शिक्षण केंद्री उपक्रमातून विद्यार्थ्यांचा विकास होत आहे. शिक्षण केवळ ज्ञान मिळवण्यासाठी नसून समाज परिवर्तनासाठी आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षक हे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासोबतच त्यांच्यातील उपजत कलागुणांना वाव देण्याचे महत्त्वाचे काम करत असून त्यांचे मोलाचे योगदान आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘पाथेय– द गोल्डन एलिक्सिर’ (Pathey – The Golden Elixir) या ई-स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, शिक्षण आणि संस्कृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समर्पित व्यक्तींना प्रतिष्ठित ‘नचिकेता’ आणि ‘सुपर नचिकेता’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

सर्वोत्तम नचिकेत पुरस्कार नितीश भारद्वाज यांना,लाईफ टाईम नचिकेत पुरस्कार रजिया हुसेन व श्रद्धा केळापुरे यांना व अकॅडमिक्स कन्सल्टंटच्या संचालिका व प्रमुख डॉ. इंदिरा नयना, सेंटर पॉईंट शाळेच्या प्राचार्या कंचन उके यांना सुपर नचिकेता पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दस्तुरे यांनी तर आभार प्रदर्शन मंगेश चिनेवार यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleफुटपाथ चोरांचा प्रताप – काळेवाडीतील जनता रस्त्यावर, प्रशासन गप्प का?
Next Article संविधान प्रस्ताविका पाडल्याप्रकरणी काँग्रेसच्या बेमुदत आंदोलनाचा तिसरा दिवस; आंदोलन स्थळी माथेफिरूंचा वावर
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वडाळा येथील जागेवर भव्य ‘सिद्धार्थ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ उभारण्याचा निर्णय; नवनियुक्त विश्वस्त अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने कामकाजाला सुरुवात

October 27, 2026

झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही,तर मूलभूत सुविधाही पुरविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 30, 2026

मिहान इंडियाकडून विविध उपक्रमांसाठी १ कोटी ३५ लाख रुपयांची मदत

August 20, 2026

अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?