Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

November 6, 2026

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी चिंचवड»संविधान प्रस्ताविका पाडल्याप्रकरणी काँग्रेसच्या बेमुदत आंदोलनाचा तिसरा दिवस; आंदोलन स्थळी माथेफिरूंचा वावर
पिंपरी चिंचवड

संविधान प्रस्ताविका पाडल्याप्रकरणी काँग्रेसच्या बेमुदत आंदोलनाचा तिसरा दिवस; आंदोलन स्थळी माथेफिरूंचा वावर

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 24, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

चिंचवड/सांगवी(प्रतिनिधी) दिनांक २४ ऑक्टोबर २०२६:- सांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या शिल्पाची कथित मोडतोड करून ते हटविण्यात आल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या बेमुदत धरणा आंदोलनाचा शनिवारी(दि.२४) तिसरा दिवस असून संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प पूर्ववत स्थापित करावे, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संबंधित लोकप्रतिनिधीं तसेच आंदोलन स्थळी माथेफिरूंचा वावर वाढला असून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत, अशा प्रमुख मागण्या काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केल्या आहेत. या आंदोलनाला विविध कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असून, आगामी काळात अधिक संघटना सहभागी होतील.

“संविधान चौकातील भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या शिल्पाची मोडतोड करून ते हटविण्यात आले आहे. नवीन शिल्प उभारण्याचे कारण सांगितले जात असले, तरी या कामासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता, नवीन शिल्पाची मंजुरी, कार्यारंभ आदेश किंवा जुने बांधकाम हटविण्याचे आदेश महानगरपालिकेकडून देण्यात आले नाहीत.या प्रकरणात महानगरपालिकेच्या संबंधित प्रभाग कार्यालयाने पोलीस आयुक्तांना पत्र देऊन काम विनापरवाना व बेकायदेशीर असल्याचे कळविले आहे. आंदोलन स्थळी माथेफिरू तथा समाजकंटक पाठवून आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचे काम विरोधक करत आहेत”

……… नरेंद्र बनसोडे, अध्यक्ष,शहर काँग्रेस, पिंपरी चिंचवड 

संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत असली, तरी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत एफआयआरची प्रत मिळाली नसून त्यामुळे नेमकी कोणती कलमे लावण्यात आली आहेत, याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.या प्रकरणात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, राष्ट्रीय सन्मानाच्या प्रतीकांचा अवमान आणि समाजात तेढ निर्माण करण्यासंदर्भातील तरतुदींनुसार कारवाई करावी. तसेच संबंधित नगरसेविका तृप्ती कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प पूर्ववत स्थापित करावे.मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार बनसोडे यांनी व्यक्त केला.

“संविधानामुळेच लोकशाही व्यवस्थेत सर्वसामान्य नागरिकांना आणि महिलांना उच्च पदांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे संविधान हे केवळ कागदावरील लिखाण नसून, प्रत्येक नागरिकाचा स्वाभिमान आणि सन्मान आहे.संबंधित नगरसेविका तृप्ती संतोष कांबळे यांनी या घटनेबाबत सार्वजनिकरीत्या खुलासा करावा, माफी मागावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा. संविधानाच्या प्रास्ताविकेचे शिल्प हटविण्यापूर्वी नियमानुसार प्रक्रिया पार पाडली गेली होती का, याची चौकशी व्हावी.या प्रकरणात संबंधितांवर योग्य त्या कायदेशीर तरतुदींनुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि शिल्पाची पुनर्स्थापना करावी.या आंदोलनाला युवक काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करतो”

…..युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिकेत सोनवणे.

आंदोलन स्थळी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे विभागीय उपक्रम निरीक्षक तौफिक हंडी,शहरातील पुरोगामी चळवळीचे नेते मानव कांबळे, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयिका समिता गोरे, काँग्रेस नेते राहुल वंजारी, अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष रवी नांगरे, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष शाबुद्दीन शेख,प्रदेश युवा काँग्रेसचे सचिव अनिकेत सोनवणे, स्वराज इंडिया अभियानचे प्रदीप पवार, आम आदमी पार्टीचे जितू बावनकर, संविधान जागर अभियानाचे श्रीकृष्ण कुलकर्णी शुभम हल्ले, स्नेहल शुभांगी, ऋषी कापडी, ज्येष्ठ गायक अशोक गायकवाड, शहर काँग्रेसचे पदाधिकारी, बीबी शिंदे, हरीश डोळस, डेनिस देवन सन, रिजवान खान, अमरपालसिंग पोथिवाल, रामकिसन माने, सुरज माने, बाबा गायसमुद्रे, शुभम थोरात, सदाशिव तळेकर, हिराचंद जाधव, आदिनाथ जावीर आदी उपस्थित होते.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभारतीय शिक्षण व्यवस्थेचा प्राचीन वारसा जपणे गरजेचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Next Article वायसीएम रुग्णालयात पोलिसाला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण व ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

November 5, 2026

पिंपरी-चिंचवडच्या आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी; दिवाळीनिमित्त मिळणार ७ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता

November 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पुणे

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेले पाकीट प्रवाशाला सुखरूप परत

By Prabhakarnewsdigital@gmail.comNovember 6, 20260

आधार, पॅन कार्ड, वाहन परवाना आणि १,२५० रुपये असलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत; चालक-वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे…

पंचांगात खरी लक्ष्मी शोधताय? मग घरगुती ‘या’ जिवंत लक्ष्मीचं काय?

November 6, 2026

महापालिकेच्या १० हजार कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाची आशा; महापौर रवी लांडगे सकारात्मक!

November 6, 2026

गणेश तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांचा पुढाकार

November 5, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?