पिंपरी/मोशी, प्रतिनिधी : मोशी येथील संजय गांधी नगर परिसरात समाजमंदिराजवळ सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून शांतता भंग केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास संजय गांधी नगर, मोशी येथील समाजमंदिराजवळ हा प्रकार घडला. सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून शांतता भंग करताना आढळल्याने गणेश महादेव टिंगरे (वय ४२), अजय गणेश टिंगरे, शुभम विलास सुधारे (वय २९) आणि नवन विलास सुधारे (वय २६) यांच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली.
याप्रकरणी पोलीस शिपाई ज्ञानेश्वर अशाके घुले यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार ११ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.३७ वाजता एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १९४(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.