Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»नाशिक»आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी नाशिकमध्ये भर पावसात हजारो समाजबांधव रस्त्यावर!
नाशिक

आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी नाशिकमध्ये भर पावसात हजारो समाजबांधव रस्त्यावर!

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 23, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वात हक्काच्या आरक्षणासाठी निर्धार

नाशिक, प्रतिनिधी…..अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाची मागणी तातडीने लागू करण्यासाठी आज नाशिक शहरात राज्यभरातून आलेल्या हजारो समाजबांधवांनी भर पावसात रस्त्यावर उतरून आपली एकजूट आणि ठाम भूमिका व्यक्त केली. प्रतिकूल हवामानाची कोणतीही पर्वा न करता मोठ्या संख्येने समाजबांधव या आंदोलनात सहभागी झाले.

आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातून वंचित आणि उपेक्षित घटकांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळावा, तसेच आरक्षणाचा लाभ गरजू घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, अशी मागणी शासनासमोर मांडण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ रोजीच्या निर्णयानुसार अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याची घटनात्मक वैधता मान्य करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून वंचित घटकांना न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

शासनाकडे प्रमुख मागण्या….

– सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ रोजीच्या निर्णयानुसार अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरण तातडीने लागू करावे.

– वंचित आणि उपेक्षित घटकांना त्यांच्या हक्काचा आणि समान न्याय मिळवून द्यावा.

– आरक्षण उपवर्गीकरणाबाबत शासनाने ठोस निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करावी.

– घटनात्मक मूल्ये आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वानुसार आरक्षणाचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचवावा.

२५ सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास २९ सप्टेंबरला मुंबईत निर्धार मोर्चा

येत्या २५ सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारने अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणाबाबत ठोस निर्णय जाहीर केला नाही, तर २९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘निर्धार मोर्चा’मध्ये राज्यभरातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या लोकशाही आणि घटनात्मक लढ्याला अधिक व्यापक स्वरूप देत २९ सप्टेंबरचा निर्धार मोर्चा हा पुढील महत्त्वाचा टप्पा असेल, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

भर पावसातही हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या समाजबांधवांच्या उपस्थितीत सामाजिक न्याय, घटनात्मक हक्क आणि आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठीचा निर्धार अधोरेखित झाला.

Post Views: 8
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleगणेशम फेज-२ दुर्घटनेनंतर भाजपा शहराध्यक्षासह भाजपा आक्रमक
Next Article पोलिस अधिकारी असल्याचे भासवून ६८ वर्षीय महिलेची ७६ लाखांची सायबर फसवणूक
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पुणे जिल्हा शाखेचा राज्यस्तरीय गौरव

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?