Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता»पोलिस अधिकारी असल्याचे भासवून ६८ वर्षीय महिलेची ७६ लाखांची सायबर फसवणूक
पिंपरी-चिंचवड गुन्हे वार्ता

पोलिस अधिकारी असल्याचे भासवून ६८ वर्षीय महिलेची ७६ लाखांची सायबर फसवणूक

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 23, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

बनावट अटक वॉरंट, सरकारी कागदपत्रे दाखवत ‘मनी लाँड्रिंग’च्या गुन्ह्याची भीती; विविध खात्यांवर रक्कम जमा करण्यास भाग पाडले

पिंपरी-चिंचवड : पोलिस अधिकारी असल्याचे भासवून एका ६८ वर्षीय महिलेची तब्बल ७६ लाख २२ हजार ५४१ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार चिखली परिसरात उघडकीस आला आहे. व्हॉट्सॲप कॉलद्वारे संपर्क साधून महिलेच्या आधारकार्डवरून सिमकार्ड काढण्यात आल्याचे सांगत, त्या सिमकार्डचा वापर गैरप्रकार, दहशतवादी संघटना आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित गुन्ह्यांसाठी झाल्याची भीती दाखवण्यात आली. त्यानंतर बनावट अटक वॉरंट, नोटिसा व शासकीय कागदपत्रे दाखवून महिलेला धमकावत तिच्याकडून विविध बँक खात्यांमध्ये मोठी रक्कम जमा करून घेतल्याचे पोलिसांनी नोंदविलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६(सी), ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा २२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.४३ वाजता दाखल करण्यात आला.

पोलिसांच्या नोंदीनुसार, २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.४८ वाजल्यापासून ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत आरोपींनी व्हॉट्सॲपवरून महिलेशी संपर्क साधला. पोलिस अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्या आधारकार्डचा गैरवापर करून सिमकार्ड काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच त्या सिमकार्डशी संबंधित गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे सांगून महिलेला घाबरविण्यात आले.

याचदरम्यान आरोपींनी सर्वोच्च न्यायालयाचे बनावट अटक वॉरंट, विविध नोटिसा आणि शासकीय दस्तऐवज असल्याचे भासविणारी कागदपत्रे डिजिटल माध्यमातून दाखविल्याचा आरोप आहे. महिलेवर दबाव निर्माण करून तिच्या घरातच डिजिटल पद्धतीने ‘अटक’ केल्याप्रमाणे परिस्थिती निर्माण करण्यात आली. तसेच तिच्याकडील सर्व रक्कम ‘शासनाकडे जमा करून पडताळणी केल्यानंतर परत मिळेल’, असे सांगण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या भूलथापांना बळी पडून महिलेने आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये एकूण ७६,२२,५४१ रुपये जमा केल्याचे पोलिसांनी नोंदविले आहे. त्यानंतर आरोपींनी बनावट शासकीय पावत्या दाखवून महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात व्हॉट्सॲप क्रमांकाचा धारक व वापरकर्ता तसेच Nixel Software Solutions Private Limited, Tapati Enterprise आणि Softgenix Professionals Pvt. Ltd. यांच्या नावावरील बँक खात्यांशी संबंधित धारक/वापरकर्ते आणि या प्रकारात सहभागी असलेल्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटक झालेले नसल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.पुढील तपास सपोनि भोपळे व पोनि गायकवाड करीत आहेत.

Post Views: 10
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी नाशिकमध्ये भर पावसात हजारो समाजबांधव रस्त्यावर!
Next Article पिंपरी-चिंचवड परिसरात विविध गुन्ह्यांची नोंद; अपघात, चोरी, जुगार व बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

September 24, 2026

पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गणेशोत्सव-२०२६ची यशस्वी सांगता

September 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 1, 20260

महापालिका तिजोरीत ६१० कोटी ४४ लाख जमा; ६६.४७ टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर पिंपरी, दि.…

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?