Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

October 2, 2026

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»नाशिक»राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पुणे जिल्हा शाखेचा राज्यस्तरीय गौरव
नाशिक

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पुणे जिल्हा शाखेचा राज्यस्तरीय गौरव

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comJuly 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नाशिक, प्रतिनिधी,दि.२७ जुलै : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक नागरी सेवा प्रबोधिनी, नाशिक येथे प्रदेशाध्यक्ष अशोक दगडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत कर्मचारी हितासाठी सातत्याने केलेले कार्य, यशस्वी आंदोलने, बेमुदत संप आणि विविध विधायक उपक्रमांबद्दल राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पुणे जिल्हा शाखेचा राज्यस्तरावर विशेष गौरव करण्यात आला.

या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष अशोक दगडे, राज्य सरचिटणीस विश्वास काटकर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण आणि संघटनेचे सचिव अविनाश दौंड यांच्या हस्ते पुणे जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष मारुती शिंदे आणि कोषाध्यक्ष विजय लांघे यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. एप्रिल २०२६ मध्ये पुणे जिल्ह्यात २१ ते २४ एप्रिलदरम्यान झालेला कर्मचारी संप यशस्वी करण्यासाठी त्यांनी केलेल्या योगदानाची दखल घेण्यात आली.

सन्मान स्वीकारल्यानंतर मारुती शिंदे यांनी शासनातील रिक्त पदे तातडीने भरणे, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस वैद्यकीय सुविधा सुरू करणे, अनुकंपा नियुक्त्या शंभर टक्के करणे, कंत्राटी पद्धत रद्द करून नियमित भरती करणे तसेच दहा वर्षांहून अधिक काळ कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याची मागणी केली. सुधारित मंजूर पदरचना व सरळ सेवा प्रवेश नियमांमुळे भरती प्रक्रिया अडचणीत आल्याचेही त्यांनी नमूद केले.

कोषाध्यक्ष विजय लांघे यांनी २०१७ पासून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या आरक्षणातील पदोन्नतीवरील स्थगितीमुळे हजारो कर्मचारी घटनात्मक लाभापासून वंचित असल्याचे सांगत, या प्रश्नावर संघटनेने प्रभावी भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.

हा सन्मान कोणत्याही एका व्यक्तीचा नसून पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कर्मचारी बांधवांच्या सामूहिक कार्याची पावती असल्याचे सांगत, भविष्यातही कर्मचारी हक्कांसाठी अधिक ताकदीने लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बैठकीत ११ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यव्यापी “मागणी दिन” साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये द्वारसभा घेऊन प्रलंबित मागण्यांबाबत कर्मचारी व शासनाचे प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच ऑगस्टअखेर शेगाव येथे राज्यव्यापी आमसभा आयोजित करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

याशिवाय राज्य सरचिटणीस विश्वास काटकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ऑक्टोबर २०२६ मध्ये मुंबई अथवा छत्रपती संभाजीनगर येथे भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच ऑक्टोबर २०२७ मधील राज्यस्तरीय अधिवेशन चंद्रपूर येथे आयोजित करण्याच्या प्रस्तावावर पुढील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

बैठकीत विश्वास काटकर आणि अशोक दगडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या ऐतिहासिक बेमुदत संपाच्या यशाबद्दल अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (RNPS) तसेच कर्मचारी वर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी त्यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक करण्यात आले.

कर्मचारी हक्क, सामाजिक न्याय आणि संघटनात्मक एकजूट यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना भविष्यातही संघर्षशील राहील, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Post Views: 13
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleआळंदी येथे संस्थेच्या ₹ २ लाखांच्या अपहाराचा गुन्हा दाखल
Next Article हिंजवडीत किरकोळ वादातून महिलेकडून काचेच्या बाटलीने हल्ला; युवक गंभीर जखमी
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी नाशिकमध्ये भर पावसात हजारो समाजबांधव रस्त्यावर!

September 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
अहिल्यानगर

शाहीर विजयकुमार मोकळे करंजगावकर ‘महाकवी वामनदादा कर्डक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

By Prabhakarnewsdigital@gmail.comOctober 2, 20260

अहिल्यानगर, रुई, (राहता) प्रतिनिधी : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त रुई, ता. राहाता,…

पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली!

October 1, 2026

गौरी-गणपती उत्सवात देवीला चढविलेला सोन्याचा हार मोलकरणीने लांबविला; २.८४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

October 1, 2026

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चार तासांत अटक

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?