अण्णाभाऊ साठे आगार व मार्केट यार्ड बसस्थानक येथे आयोजन; प्रवाशांशी साधला थेट संवाद
पुणे प्रतिनिधी : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) यांच्या वतीने प्रवाशांच्या समस्या, सूचना व अडचणी जाणून घेण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आगार व मार्केट यार्ड बसस्थानक येथे प्रवासी दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. महेश आव्हाड (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात प्रवाशांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेण्यात आल्या. प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या कार्यक्रमास भाजपा स्थानिक नगरसेविका सौ. मनिषाताई चोरबोले तसेच भाजपा स्थानिक नगरसेविका सौ. वर्षाताई साठे यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई जाधव आणि वंदना जाधव उपस्थित होत्या.
यावेळी पीएमपीएमएल प्रशासनाच्या वतीने आगार व्यवस्थापक श्री. सुनील दिवाणजी, क्लर्क श्री. दीपक विरणक, श्री. अभिजीत साबळे, श्री. संदीप बडदे, श्री. पुष्पराज गायकवाड आणि श्री. विश्वास थोरात यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रवाशांच्या समस्या थेट ऐकून त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
