Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय»दिल्लीतील मऱ्हाटी एम्पोरियममध्ये रविवारपासून गणेशमूर्ती विक्री पुरणपोळीही उपलब्ध
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

दिल्लीतील मऱ्हाटी एम्पोरियममध्ये रविवारपासून गणेशमूर्ती विक्री पुरणपोळीही उपलब्ध

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नवी दिल्ली, दि. २७ ऑगस्ट: दिल्लीतील बाबा खडकसिंह मार्गावरील महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या मऱ्हाटी एम्पोरियममध्ये रविवारपासून गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात होणार आहे. गणेशभक्तांसाठी हे प्रदर्शन १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत खुले राहणार आहे. महाराष्ट्रातील मूर्तीकारांच्या कलेला प्रोत्साहन देतानाच त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि दिल्लीतील गणेशभक्तांना गणेशोत्सवासाठी आवश्यक साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

महामंडळाच्या वतीने गेल्या ३० वर्षांपासून या गणेशमूर्ती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील ३० हून अधिक गणेश मंडळांमध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

यंदाच्या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पेण येथील सपना जाधव आणि वीणा भट यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कारागिरांनी शाडूची माती आणि कागदाच्या लगद्यापासून साकारलेल्या ५०० हून अधिक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती. ६ इंचांपासून ३ फुटांपर्यंत विविध आकारांत उपलब्ध असलेल्या या आकर्षक मूर्तींची किंमत १,५०० रुपयांपासून २५ हजार रुपयांपर्यंत आहे.

गणेशमूर्तींसोबतच गणेशोत्सवासाठी आवश्यक पूजासाहित्य, सजावटीचे साहित्य, पैठणीची तोरणे, आसने आणि विविध पूजावस्तूही येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना उत्सवाची आवश्यक खरेदी एकाच ठिकाणी करता येणार आहे.

या प्रदर्शनाचे आणखी एक आकर्षण म्हणजे गणेशभक्तांना येथे महाराष्ट्रीयन चवीच्या गरमागरम पुरणपोळीचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामुळे गणेशमूर्ती खरेदीसोबतच महाराष्ट्राच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आनंदही दिल्लीकरांना घेता येणार आहे.गणेशमूर्तींचे बुकिंग तसेच प्रदर्शनासंदर्भातील अधिक माहितीसाठी ०११-२३३६३८८८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच सपना जाधव (९९७०२७७५५७) आणि वीणा भाट (८९९९१२०९४९) यांच्याशी संपर्क साधून मूर्तींचे बुकिंग करता येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपळवंडीतील पीडित कुटुंबाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट
Next Article हुंडाबळीने पुन्हा पिंपरी-चिंचवड हादरले; वाकडमध्ये विवाहितेची आत्महत्या
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

महाराष्ट्र ३३,८७२ स्टार्टअप्ससह देशात अव्वल, मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र म्हणून उदयास -केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

September 7, 2026

छत्रपती शिवरायांच्या विचारांवरनवी दिल्लीत राष्ट्रीय चर्चासत्र

August 31, 2026

केअर फॉर यू फाउंडेशनच्या ४३ विद्यार्थ्यांची इस्रो सफर

August 16, 2026

रेड झोनमुक्तीपासून महामार्ग, क्रीडा क्रांती ते महिला उद्योग क्लस्टरपर्यंत विकासाचा व्यापक अजेंडा… रवी लांडगे

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?