Close Menu
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

September 9, 2026

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
prabhakarnews.online
Subscribe Login
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
prabhakarnews.online
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home»पुणे»पिंपळवंडीतील पीडित कुटुंबाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट
पुणे

पिंपळवंडीतील पीडित कुटुंबाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट

Prabhakarnewsdigital@gmail.comBy Prabhakarnewsdigital@gmail.comAugust 27, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे, दि.२७ ऑगस्ट : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पिंपळवंडी येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

या प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल. प्रकरणाची पारदर्शक व सखोल चौकशी करून दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळण्यासाठी शासनाकडून आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

या घटनेच्या तपासाबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्याकडून माहिती घेतली. तपासामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये तसेच प्रकरणाचा तपास वेगाने आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याच्या सूचना देऊन लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले.

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविणार

या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी, यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल,असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

ही घटना अत्यंत वेदनादायी असून, प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणाचा बारकाईने तपास करावा, अशा सूचना पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. पीडित कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी तसेच त्यांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने शबरी घरकुल योजनेतून घरकुल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच घटनेच्या पार्श्वभूमीवर मोक्याच्या ठिकाणी महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे तसेच हायमास्क दिवे बसविण्याची तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.

पिंपळवंडीतील वस्तीमध्ये जातीचे दाखले उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येईल, अशी माहितीही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिली.

पीडित कुटुंबाला राष्ट्रवादी वेल्फेअर फंडामार्फत आर्थिक मदत जाहीर करण्यात येत आहे. तसेच महिला व बालविकास आयुक्त वर्षा वंटवाल यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून दहा लाख रुपयांची मदत देण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागाला देण्यात आल्या आहेत. सदर मदतीस न्यायालयीन समितीने मंजुरी दिली असून, दहा लाख रुपयांची रक्कम आजच पीडित कुटुंबाच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

पिडीत कुटुंबाला शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत व सहकार्य करण्यात येईल. कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.यावेळी आमदार शरद सोनवणे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, जिल्हा परिषद सदस्य छाया तांबे, कल्पना काळे, सोनाबाई दाभाडे यांच्यासह अमित बेनके, विकास दरेकर, देवराम लांडे, पूजा बुट्टे, सुप्रिया लेंडे, उप जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय पाटील यांच्यासह पिंपळवंडी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 11
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleगणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी; अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Next Article दिल्लीतील मऱ्हाटी एम्पोरियममध्ये रविवारपासून गणेशमूर्ती विक्री पुरणपोळीही उपलब्ध
Prabhakarnewsdigital@gmail.com
  • Website

Related Posts

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ चे दिमाखात उद्घाटन

September 7, 2026

दहीहंडीतील लावणीवरून राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा!

September 7, 2026

धनगर ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

September 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
बुलढाणा

‘एनसीएमसी कार्ड’बाबत गैरसमज नको; प्रवासावेळीच रक्कम भरा!

By Prabhakarnewsdigital@gmail.comSeptember 9, 20260

दर महिन्याला रिचार्ज करणे बंधनकारक नाही; वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी यांचे आवाहन बुलढाणा प्रतिनिधी…

किवळेतील विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

September 8, 2026

सामाजिक कार्याबद्दल सुभाष ढवळे यांचे कौतुक

September 8, 2026

महापौर निवासासाठी शिवजयंतीची जागा बळकावू नका!

September 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

प्रभाकर News हे विश्वासार्ह, वेगवान आणि निष्पक्ष डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो.
सत्य, अचूकता आणि पारदर्शकता हे आमच्या पत्रकारितेचे मुख्य मूल्य आहेत.
राजकारण, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक विषय आणि सरकारी योजनांवरील माहिती आम्ही प्रकाशित करतो.
समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांना आवाज देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
वाचकांना विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
डिजिटल पत्रकारितेद्वारे समाजजागृती आणि सकारात्मक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रभाकर News – सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता.

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • उद्योग व्यापार
  • समाजकारण
  • कला
  • कृषी
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
2026- All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?